Join us  

बाबो! टिकटॉकर आमिर सिद्दीकीला OLXवर 200 रूपयांत काढले विकायला? नेटक-यांनी घेतली मजा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 4:00 PM

आमिर सिद्दीकीचा हा फोटो क्षणात व्हायरल झाला आणि यानंतर नेटक-यांच्या हातात जणू आयते कोलित सापडले. 

ठळक मुद्देआमिर सिद्दीकी हा मुळचा मुंबईतील राहणारा असून तो टिक टॉकर आहे.

युट्यूबर कॅरी मिनाटीने रोस्ट केले आणि यानंतर टिक टॉकर आमिर सिद्दीकी अनेक वादात सापडला. नेटक-यांनी आमिरला अगदी सळो की पळो करून सोडले.आमिरने एक व्हीडिओ तयार केला होता. ज्यात टीकटॉक युट्यूबपेक्षा कसा चांगला आहे, असा दावा त्याने केला होता. याच व्हीडिओचा कॅरी मिनाटीने समाचार घेतला होता आणि दोघांमध्ये हे युद्ध सुरू झाले होते.आमिर सिद्दीकीनेही कॅरीमिनाटीच्या पहिल्या व्हीडिओला उत्तर देत आम्ही युट्यूबचा विरोध करत नसून केवळ सायबर बुलिंग विरोधात आहोत, असे म्हटले होते. कॅरी मिनाटी हे समजून घेईल, असेही त्याने म्हटले होते. सध्या हा वाद  काहीसा थंड झाला असला तरीही सोशल मीडियावर याबद्दल चर्चा सुरूच आहे. तूर्तास आमिरच्या एका फोटोची नेटकरी चांगलीच खिल्ली उडवत आहेत. यात ओएलएक्सवर आमिर सिद्दीकीचा एक फोटो दिसतोय आणि आमिर ओएलएक्सवर 200 रूपयांत विकणे असल्याचे लिहिलेय.आमिर सिद्दीकीचा हा फोटो क्षणात व्हायरल झाला आणि यानंतर नेटक-यांच्या हातात जणू आयते कोलित सापडले. त्यांनी आमिरची चांगलीच मजा घेतली.आमिर सिद्दीकी ओएलक्सवर 200 रूपयांत...बस यही देखना रह गया था, असे म्हणत एका युजरने आमिरची खिल्ली उडवली.

याला कोण विकत घेणार, असे लिहून अन्य एका युजरने तर धम्माल उडवून दिली.

 एकाने आमिर सिद्दीकी 200 रूपयांत, त्वरा करा, असे लिहिले. 

एकंदर काय तर नेटक-यांनी आमिरला पुन्हा एकदा सळो की पळो करून सोडले आहे.

आमिर सिद्दीकी हा मुळचा मुंबईतील राहणारा असून तो टिक टॉकर आहे. त्याचे एकूण ३.७ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तो टिक टॉकरवर  कॉमेडी कंटेंट शेअर करत असतो.

 

टॅग्स :टिक-टॉक