Join us  

‘याला म्हणतात कर्माचे फळ...’! टिकटॉक बॅन होताच पुन्हा एकदा ट्रेंड होतोय कॅरी मिनाटी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 3:41 PM

टिकटॉक भारतात बंद झाल्यानंतर टिकटॉक स्टार्सला नेटक-यांनी सळो की पळो करून सोडले आहे. याला कारण आहे एक जुना वाद.

ठळक मुद्देटिकटॉक स्टार्सला त्यांच्या कर्माचे फळ मिळाले. टिकटॉकर्सनी कॅरी मिनाटीचा व्हिडीओ बॅन केला होता. आता काय तर टिकटॉकच बॅन झाले, असे काय काय  कॅरीचे चाहते म्हणजेच युट्यूबर्स म्हणत आहेत.

केंद्र सरकारने भारताच्या सुरक्षिततेला धोका ठरू शकणा-या 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला.   केंद्र सरकारने बंदी घातलेल्या अ‍ॅप्समध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. भारत सरकारच्या या निर्णयानंतर ट्विटरवर कॅरी मिनाटी या नावाने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. नेटकरी  या हॅशटॅगसह टिकटॉक स्टार्सची जबरदस्त खिल्ली उडवताना दिसत आहेत.

का उडवली जातेय टिकटॉक स्टार्सची खिल्लीटिकटॉक भारतात बंद झाल्यानंतर टिकटॉक स्टार्सला नेटक-यांनी सळो की पळो करून सोडले आहे. याला कारण आहे एक जुना वाद. होय, काही दिवसांपूर्वी युट्यूब विरूद्ध टिकटॉक असे वॉर सोशल मीडियावर सुरु झाले होते. या वॉरची सुरुवात केली होती टिकटॉक स्टार आमिर सिद्दीकने. त्याने युट्यूबर्सला डिवचणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. यानंतर लोकप्रिय युट्यूबर कॅरी मिनाटीने त्याला त्याच्याच भाषेत उत्तर दिले होते. कॅरी मिनाटीचा हा रोस्ट व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. आमिर सिद्दीकीला रोस्ट करणारा कॅरीचा हा व्हिडीओ भारतातील सर्वाधिक लाईक्स मिळवणारा व्हिडीओ ठरला होता. 

अर्थात काही लोकांच्या तक्रारीनंतर युट्यूबने कॅरीचा हा व्हिडीओ आपल्या प्लॅटफॉर्मवरून डिलीट केला होता. आता टिकटॉक बॅन होताच कॅरी मिनाटीचे समर्थक पुन्हा अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. टिकटॉक स्टार्सला त्यांच्या कर्माचे फळ मिळाले. टिकटॉकर्सनी कॅरी मिनाटीचा व्हिडीओ बॅन केला होता. आता काय तर टिकटॉकच बॅन झाले, असे काय काय  कॅरीचे चाहते म्हणजेच युट्यूबर्स म्हणत आहेत. यावरचे अनेक मीम्स आणि जोक्स व्हायरल होत आहेत.

टॅग्स :टिक-टॉकयु ट्यूब