Join us  

अभिनेता टायगर श्रॉफच्या कॅसिनोवा गाण्यात झळकणार गायिका रवीना मेहता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 1:02 PM

गायक रवीना मेहता यांना टायगर आणि तिच्या टीम सोबत काम केल्या बद्दलच्या अनुभवाविषयी विचारले असता ती म्हणाली की टायगर माझ्यासाठी प्रेरणास्थान सारखेच आहे.

अभिनेता टायगर श्रॉफने काही दिवसांपूर्वी कॅसिनोवा हे गाणं त्याच्या  यूट्यूबवर रिलीज केले होते आणि ह्या गाण्याला त्याच्या चाहत्यांनी भरभरून पसंती दिली. नुकताच टायगर ह्या गाण्याचा टीजर त्याच्या इन्स्टाग्राम वर शेअर केला होता. या गाण्यात टायगर सोबत सिंगर रवीना मेहताने सुद्धा आपला मधुर आवाज दिला आहे. कॅसिनोवा 2 फेब्रुवारी २०२० रोजी टायगर च्या यूट्यूब चॅनेलवर रिलीज होणार आहे.

 टायगर श्रॉफ म्हणाला  की, "रवीनासारख्या कलाकाराबरोबर काम करणे खूप प्रेरणादायक होते. ती खूप टॅलेंटेड गायक आहे आणि रवीनाने मला गाण्यामध्ये अधिक चांगले होण्यासाठी प्रेरित केले. मला तिच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली याबद्दल मी खूप आभारी आहे. गायिका रवीना मेहताने अविस्तेश श्रीवास्तव सोबत 'यादे' या गीतातून संगीत क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर लॉकडाऊनमध्ये रवीनाने ऋषी रिच, राहुल जैन, रिषभ कांत यांसोबत तब्बल ४ गाणी रिलीज केली.  

गायक रवीना मेहता यांना टायगर आणि तिच्या टीम सोबत काम केल्या बद्दलच्या अनुभवाविषयी विचारले असता ती म्हणाली की टायगर माझ्यासाठी प्रेरणास्थान सारखा आहे.  तो त्याच्या कलेत अत्यंत वैविध्यपूर्ण आणि अभूतपूर्व आहे. अवितेश श्रीवास्तवने आमची स्टुडिओमध्ये ओळख करून दिली. माझ्यासाठी हे गाण्याचं शूट म्हणजे खूप  सुंदर प्रवास आहे आणि मी प्रेक्षकांसमोर हे गाणं सादर करण्यासाठी उत्सुक आहे. चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाची मी आतुरतेने वाट बघते आहे.

 

जॅकी भगनानीसोबत एक नाही तर दोन सिनेमे साइन केले टायगरने,मानधनाचा आकडा वाचून व्हाल चकीत

विशेष बाब म्हणजे टायगरने दोन चित्रपट साइन केले आहेत. तो गणपतमध्ये दिसणार आहे. याशिवाय या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी टायगरला साइन करण्यात आले आहे. या दोन्ही चित्रपटासाठी ५० कोटी मानधन मिळणार आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती मिळाली नाही.टायगर श्रॉफ गणपत शिवाय गणपत २मध्ये दिसणार आहे. तसेच हिरोपंतीचा सीक्वल येणार असल्याचेही समजते आहे. यात त्याच्यासोबत क्रिती सनॉन दिसणार असल्याचे बोलले जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अहमद खान करणार आहे. पुढील वर्षी जुलैमध्ये चित्रपट रिलीज होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त टायगर रॅम्बोमुळे चर्चेत आहे. मात्र हा चित्रपट अंडर प्रोडक्शन आहे. त्यामुळे या चित्रपट बनण्यासाठी अजून अवकाश आहे.

टॅग्स :टायगर श्रॉफ