Join us

​-म्हणून ‘बागी2’च्या प्रमोशनदरम्यान सतत आजारी पडतोय टायगर श्रॉफ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 15:21 IST

सध्या टायगर श्रॉफ ‘बागी2’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण या प्रमोशनदरम्यान टायगर सतत आजारी पडतोय. पण खरोखरं नाही तर हा ...

सध्या टायगर श्रॉफ ‘बागी2’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. पण या प्रमोशनदरम्यान टायगर सतत आजारी पडतोय. पण खरोखरं नाही तर हा त्याचा बहाणा आहे, हे आता स्पष्ट झालेय. होय, गेल्या काही दिवसांत टायगर सतत आजारी असल्याचा बहाणा करताना दिसतोय आणि याला कारण  म्हणजे तेच ते कंटाळवाणे प्रश्न. आश्चर्य वाटले ना. पण हे खरे आहे.‘बागी2’च्या प्रमोशनदरम्यान पत्रकारांचे तेच ते घुमवून फिरवून विचारलेले प्रश्न टायगरला कंटाळवाणे वाटू लागले आहे. पत्रकार मला एकच एक प्रश्न विचारतात. या प्रश्नांची उत्तरे देऊन मी थकून जातो.  या कंटाळवाण्या प्रश्नांची हसत हसत उत्तरे देणे माझ्या जीवावर येते आणि मग मी मुलाखत टाळण्यासाठी,   वेगवेगळे बहाणे पुढे करतो. प्रमोशनदरम्यान चाहत्यांना भेटायची संधी मिळते, हे खरे. पण मुलाखतीतील रटाळ प्रश्न मात्र वैताग आणतात. आधीच ‘बागी2’सारखे अ‍ॅक्शनपॅक्ड चित्रपट तुम्हाला थकवतात. यानंतर प्रमोशन प्रचंड जड जाते,असे टायगर अलीकडे म्हणाला. टायगर अलीकडे वारंवार आजारी का पडू लागला आहे, याचे उत्तर त्याच्या याच ‘बहाण्यात’ दडलेले आहे.   खरे तर बॉलिवूडमध्ये टायगर केवळ चार चित्रपट जुना आहे. पण त्याची फॅन फॉलोर्इंग जबरदस्त आहे. आता ही इतकी मोठी फॅन फॉलोर्इंग टिकवायची तर कंटाळवाण्या प्रश्नांची उत्तरे तर द्यावी लागतीलचं. हे टायगरला जितक्या लवकर कळेल, तितके बरे, होय ना?ALSO READ : ‘या’ गोष्टीमुळे जॅकी श्रॉफ यांना भरते धडकी!‘बागी2’ या चित्रपटात  टायगरने जबरदस्त अ‍ॅक्शन सीन्स दिले आहेत. येत्या ३० मार्चला रिलीज होणा-या या चित्रपटात टायगर त्याची रिअल लाईफ गर्लफ्रेन्ड दिशा पटनीसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. हा चित्रपट गतवर्षी आलेल्या ‘बागी’चा हा सीक्वल आहे. ‘बागी’मध्ये टायगरसोबत श्रद्धा कपूर दिसली होती. पण ‘बागी2’मध्ये श्रद्धाची जागा दिशाने घेतलीयं. ‘बागी’हा चित्रपट साबीर खानने दिग्दर्शित केला होता. ‘बागी2’ मात्र अहमद खानने दिग्दर्शित केला आहे.