Join us  

टायगर श्रॉफ म्हणतो,‘हा सिनेमा फक्त आम्हा दोघांसाठीच’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2019 2:12 PM

टायगरने सुद्धा काही वर्षांपूर्वीच हिंदी सिनेसृष्टीत येऊन आपल्या नृत्यकौशल्याची छाप चाहत्यांवर पाडली आहे. हृतिकला आपल्या आदर्शस्थानी मानणारा टायगर लवकरच त्याच्यासोबत एका चित्रपटातून झळकणार आहे.

अ‍ॅक्शन आणि डान्स यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ. बऱ्याच वर्षांपासून हृतिकने त्याच्या अनोख्या नृत्यशैलीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. टायगरने सुद्धा काही वर्षांपूर्वीच हिंदी सिनेसृष्टीत येऊन आपल्या नृत्यकौशल्याची छाप चाहत्यांवर पाडली आहे. हृतिकला आपल्या आदर्शस्थानी मानणारा टायगर लवकरच त्याच्यासोबत एका चित्रपटातून झळकणार आहे.

हृतिकसोबत स्क्रीन शेअर करायला उत्सुक असलेला टायगर श्रॉफ एका मुलाखतीत म्हणाला की, ‘मला एकट्याला चित्रपट करायचा आहे की एखाद्या अभिनेत्याबरोबर करायचा आहे हे स्क्रिप्टवरून ठरते. आता मी हृतिक सरांसोबत जो चित्रपट करतोय, तो चित्रपट एकमेकांशिवाय होऊच शकला नसता. तुम्हाला तुमचे कौशल्य योग्य पद्धतीने मांडू देणाऱ्या  स्क्रिप्ट्स खूप दुर्मिळ असतात. मला असं वाटतं, की जर स्क्रिप्ट चांगली असेल तर दोन अभिनेत्यांनी एकत्र येण्यास काय हरकत नाही. या स्क्रिप्टमध्ये आम्ही आमची कला आमच्या शैलीत मांडू शकतो.’

हा चित्रपट सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करणार आहेत. हा चित्रपट अ‍ॅक्शन थ्रिलर असून यामध्ये टायगर व हृतिकच्या नृत्याची जुगलबंदी बघायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी हृतिकचे मानधन जवळपास ४८ कोटी रुपयांचे आहे. हृतिक दोन वर्षांनी ‘सुपर ३०’ मधून रुपेरी पडद्यावर येत आहे. या चित्रपटात हृतिक गरीब मुलांना शिकवणाऱ्या  शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हृतिकने आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांचं व्यक्तिमत्त्व प्रेक्षकांपुढे साकारलं आहे.

टॅग्स :हृतिक रोशनटायगर श्रॉफ