Join us  

'हीरोपंती 2' मध्ये टायगर श्रॉफसोबत दिसणार तारा सुतारिया, सोशल मीडियावर दिली माहिती

By गीतांजली | Published: October 30, 2020 4:44 PM

या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहेत.

टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2' सिनेमाची नुकतीच ऑफिशियल घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियाडवाला करणार आहेत. या सिनेमात टायगरसोबत तारा सुतारिया रोमान्स करताना दिसणार आहे. तारा करण जोहरच्या 'स्टुंडट ऑफ इअर 2'मधून बॉलििवूडमध्ये डेब्यू केला होता. टायगरसोबत स्क्रीन शेअर करण्यासाठी तारा उत्सुक आहे. इन्स्टाग्रामवर तिने आपला आनंद व्यक्त केला.  

'हीरोपंती 2'चे शूटिंग डिसेंबरमध्ये होणार आहे. ताराशिवाय यात सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीसोबत 'आरएक्स 100' या तमिळ सिनेमाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. तारा 'स्टुंडट ऑफ द इअर 2' त्याचवर्षी रिलीज झालेल्या 'मरजावां' सिनेमात दिसली होती. तारा सुतारिया आणि आदर जैन लवकरच लग्न करणार असल्याचे समजते आहे.आदर जैन लवकरच गर्लफ्रेंड तारा सुतारियासोबत सात फेरे घेणार आहे. दोघेही त्यांच्या नात्याबद्दल खूप सीरियस आहेत आणि ते लवकरच लग्नबेडीत अडकण्याची शक्यता आहे.

आदरचे करियर अद्याप सुरू झाले नाही आहे. तर ताराने २०१९ साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि आताच तिने तिच्या करिअरला सुरूवात केली आहे. मात्र त्यांच्या लग्नासाठी काहीही अडचण नाही.बऱ्याचदा दोघे एकत्र स्पॉट झाले आहेत. आता ते दोघे लग्न कधी करणार, हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत. 

टॅग्स :तारा सुतारियाटायगर श्रॉफ