Join us  

2020 मध्ये येणार ‘बागी 3’; पाहा, फर्स्ट लूक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2018 11:34 AM

काही क्षणांपूर्वी टायगर श्रॉफने ‘बागी 3’चा फर्स्ट लूक जारी केला. यासोबत या चित्रपटाच्या रिलीज डेटचाही खुलासा झाला.

ठळक मुद्देदुसरा पार्ट रिलीज होण्याआधीच मेकर्सने या चित्रपटाच्या तिसऱ्या पार्टची घोषणा केली होती. म्हणजे, ‘बागी 2’ प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘बागी 3’ येणार, हे ठरले होते. या तिस-या पार्टमध्ये पहिल्या व दुस-या पार्टपेक्षाही जबरदस्त अ‍ॅक्शन असेल, असा दावाही मेकर्सने केल

यावर्षी रिलीज झालेल्या टायगर श्रॉफच्या ‘बागी 2’ने बॉक्स ऑफिसवर धूम केली. पहिल्याच दिवशी २५ कोटींचा व्यवसाय करून या चित्रपटाने अनेक विक्रम रचले. या चित्रपटाबद्दलची एक खास बात म्हणजे, दुसरा पार्ट रिलीज होण्याआधीच मेकर्सने या चित्रपटाच्या तिसऱ्या पार्टची घोषणा केली होती. म्हणजे, ‘बागी 2’ प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘बागी 3’ येणार, हे ठरले होते. या तिस-या पार्टमध्ये पहिल्या व दुस-या पार्टपेक्षाही जबरदस्त अ‍ॅक्शन असेल, असा दावाही मेकर्सने केला होता. त्यामुळे चाहते ‘बागी 3’कडे डोळे लावून बसले होते. अखेर ‘बागी 3’ची घोषणा झाली.

काही क्षणांपूर्वी टायगर श्रॉफने ‘बागी 3’चा फर्स्ट लूक जारी केला. यासोबत या चित्रपटाच्या रिलीज डेटचाही खुलासा झाला. होय, हा बहुप्रतिक्षीत चित्रपट ६ मार्च २०२० रोजी प्रदर्शित होतोय. टायगरने या चित्रपटाचा एक फोटोही शेअर केला आहे. यात त्याचा रफ टफ लूक दिसतोय. त्याचा हा लूक पाहता चित्रपटही ‘रफ टफ’असणार, यात शंकाचं नाही.

‘बागी 3’मध्ये टायगर लीड रोलमध्ये असणार हे स्पष्ट झाले आहे. पण टायगरच्या हिरोईनचे नाव मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. मध्यंतरी सारा अली खान टायगरची हिरोईन बनणार, अशी चर्चा होती. मात्र साराने ही चर्चा अफवर असल्याचे म्हटले होते. त्यामुळे टायगरच्या अपोझिट कुण्या हिरोईनची वर्णी लागते, हे पाहणे इंटरेस्टिं असणार आहे. ‘बागी’ व ‘बागी 2’ या दोन्ही चित्रपटांना पे्रक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. ‘बागी’मध्ये टायगर श्रॉफसोबत श्रद्धा कपूर दिसली होती. दोघांचीही आॅनस्क्रिन केमिस्ट्री जबरदस्त होती. ‘बागी’ हिट झाल्यानंतर याच्या सीक्वलमध्ये टायगरसोबत त्याची कथित गर्लफ्रेन्ड दिशा पटानी झळकली. टायगर व दिशाचा रोमान्सही हिट झाला. 

टॅग्स :टायगर श्रॉफसारा अली खानश्रद्धा कपूर