Join us  

'या' फोटोमुळे न्यु इअरलाच पुन्हा ट्रोल झाली टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पटानी,जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2019 7:00 AM

या फोटोमुळे पुन्हा दीशा नेटक-यांकडून ट्रोल झाली आहे. एकीकडे तिच्या या फोटोची नेटीझन्स खिल्ली उडवत असले तरीही दोन तासांत दहा लाखांहून अधिक लोकानी दिशाचा हा फोटो  पाहिला आहे.

दिशा पटानी सध्या मालदीवमध्ये न्यू इयर सेलिब्रेट करत आहे. न्यु इअर सेलिब्रेशनचे फोटोही ती तिच्या चाहत्यांसह सोसळ मीडियावर शेअर करत आहे.तिथेल तिचे हॉट अंदाजातील फोटोही तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे.तिच्या या फोटोंवर नेहमीप्रमाणेच संमिश्र प्रतिक्रीया येत असल्याचे पाहायला मिळत आहे. या फोटोमुळे पुन्हा दीशा नेटक-यांकडून ट्रोल झाली आहे. एकीकडे तिच्या या फोटोची नेटीझन्स खिल्ली उडवत असले तरीही दोन तासांत दहा लाखांहून अधिक लोकानी दिशाचा हा फोटो  पाहिला आहे.सतत हॉट फोटो शेअर करत असल्यामुळे दिवसेंदिवस दीशाच्या फॅन्सच्या संख्येत वाढ होत आहे.

दिशाच्या फोटोला युजर्सकडून अशा कमेंटस मिळण्याची ही काही पहिली वेळ नाही. याआधीही तिला तिच्या ड्रेसिंग स्टाइलवरून ट्रोल केले गेले आहे. दिवाळीत दिशाने इन्स्टाग्राम तिचा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटात तिने लाईट क्रिम रंगाचा लहेंगा घातला आणि त्यावर त्याच रंगाची ओढणी घेतली आहे आणि तिच्या हातात दिवा होता.

पण या लहेंगावर तिने ब्लॉऊज घालण्याऐवजी स्पोटर्स ब्रा घातली होती. त्यामुळे नेटिझन्सने तिची चांगलीच खिल्ली उडवली होती. दिशाने दिवाळीच्या निमित्ताने हा फोटो शेअर केला असला तरी तिने त्यासोबत काहीही कॅप्शन शेअर केलेले नव्हते. पण तिचा हा फोटो पाहून नेटिझन्स चांगलेच संतापले होते. दिशा तू ब्लॉऊज घालायला विसरलीस का, तू यात खूपच वाईट दिसत आहेस... दिवाळीला तरी चांगले कपडे घालत जा, स्पोटर्स ब्राला ब्लाऊजसारखे कोण घालतं का, फोटो क्लिक करण्याआधी कपडे घालायला विसरलीस का यांसारख्या चित्रविचित्र प्रतिक्रिया दिशाच्या फॅन्सने तिच्या फोटोवर दिल्या होत्या.

टॅग्स :दिशा पाटनी