दिशा पटनी करतेय टायगर श्रॉफची हेरगिरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2017 15:25 IST
दिशा पटनी आणि टायगर श्रॉफ यांचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही. दोघांनीही अनेकदा एकत्र स्पॉट केले गेले आहे. दोघेही ...
दिशा पटनी करतेय टायगर श्रॉफची हेरगिरी?
दिशा पटनी आणि टायगर श्रॉफ यांचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही. दोघांनीही अनेकदा एकत्र स्पॉट केले गेले आहे. दोघेही आपल्या नात्याबद्दल सीरिअस आहेत, असेही कळतेय. पण अलीकडे दिशामुळे टायगर जाम वैतागला आहे. दिशाचे पॉसिजीव नेचर टायगरसाठी अडचणीचे ठरत आहे. दिशाचा हा स्वभाव दोघांमधील वादाचे कारण बनत असल्याची खबर आहे.चर्चा खरी मानाल तर, दिशा सतत टायगरवर वॉच ठेवते. काही दिवसांपूर्वी ती ‘मुन्ना मायकेल’च्या सेटवर जाऊन पोहोचली होती. टायगर ‘मुन्ना मायकेल’मधील त्याची को-स्टार निधी अग्रवालसोबत जरा जास्तच वेळ घाालवू लागला होता. ही गोष्ट उडत उडत दिशाच्या कानावर गेली आणि मग तिचे पॉसिजीव नेचर समोर आले. निधीसोबतच्या टायगरच्या वाढत्या जवळीकीमुळे दिशा इतकी चिंतीत झाली की, हेरगिरी करायला अचानक ‘मुन्ना मायकेल’च्या सेटवर येऊन धडकली.टायगर व दिशा यांचे नाते आता बरेच पुढे गेलेय. टायगरच्या मॉम-डॅडनी या नात्याला संमती दिल्याचेही कळतेय. दिशा व टायगर दोघांनाही अनेकदा मुव्ही डेट व हॉली डे एन्जॉय करताना बघितले गेलेय. दिशा व टायगरची पहिली भेट ‘बागी’च्या सेटवर झाली होती. श्रद्धा कपूरच्या आधी या चित्रपटात दिशाची वर्णी लागली होती. पण ऐनवेळी दिशाचा पत्ता कट झाला अन् श्रद्धाची निवड झाली. पण तोपर्यंत दिशा व टायगर परस्परांच्या बरेच जवळ आले होते.ALSO READ : दिशा पटनी म्हणते, मला हाच हिरो हवा!सध्या टायगरच्या हाती अनेक चित्रपट आहेत. दिशाचे बॉलिवूड करिअर म्हणाल, तर तिचे देऊळ सध्या पाण्यात दिसतेय. त्यातच मी केवळ ए- लिस्टेड स्टार्ससोबतच काम करणार, अशी दिशाची अट आहे.