Join us  

टायगर श्रॉफने अशाप्रकारे चित्रीत केली अ‍ॅक्शन दृश्यं, एका दृश्यामुळे झाला होता डोकेदुखीचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 6:00 AM

बागी 3 या चित्रपटात टायगर श्रॉफवर अनेक अ‍ॅक्शन दृश्यं चित्रीत करण्यात आली आहेत.

ठळक मुद्देअहमद सांगतो, “आडव्या स्थितीत उभे राहिल्याने डोक्याकडे रक्तप्रवाह जोरात वाहतो. शिवाय कारच्या काचा फुटलेल्या होत्या. त्यामुळे मला भीती वाटत होती. या दृश्यामुळे टायगरला दिवसभर डोकेदुखीने हैराण केले.”

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात द कपिल शर्मा शोमध्ये प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर, रितेश देशमुख, अंकिता लोखंडे व दिग्दर्शक अहमद खान हजेरी लावणार आहेत. ते त्यांच्या ‘बागी 3’ या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करणार आहेत.  

‘बागी 3’ या चित्रपटातील कलाकार त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी गप्पा मारणार आहेत. त्याचसोबत या चित्रपटाच्या सेटवरील अनेक सिक्रेट्स कपिल आणि त्याच्या टीमसोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना खळखळून हसायला मिळणार यात काहीच शंका नाहीये. 

टायगर श्रॉफने एका तासात चित्रित केलेल्या अ‍ॅक्शन दृश्यांबद्दल कपिलने विचारले असता अहमद खानने सांगितले, “आम्हाला ते दृश्य मर्यादित अवधीत पूर्ण करायचे होते. कारण एक दिवसासाठी आम्ही 500 ते 600 गाड्या मागवल्या होत्या. शिवाय लोकांना एक अस्सल अ‍ॅक्शनने ठासून भरलेला चित्रपट देण्याची आमची इच्छा होती, केवळ VFX ने तयार केलेली दृश्ये आम्हाला लोकांना दाखवायची नव्हती. त्यामुळे दोरीच्या साहाय्याने टायगर कारच्या टपावर हॉरिझॉन्टल धावत असल्याचे दृश्य चित्रीत करण्यात आले.”

 हे दृश्य चित्रीत करणे किती कठीण होते याबद्दल अहमद सांगतो, “आडव्या स्थितीत उभे राहिल्याने डोक्याकडे रक्तप्रवाह जोरात वाहतो. शिवाय कारच्या काचा फुटलेल्या होत्या. त्यामुळे मला भीती वाटत होती आणि त्याच्यात आमच्याकडे केवळ एकच तास होता. त्यामुळे टायगरला मी सांगितले होते की, आपल्याकडे पुरेशी चांगली दृश्यं आहेत. पण तो सतत आणखी एक टेक घेण्याचा आग्रह धरत होता. ते करण्याचे मी टाळत होतो. पण या दृश्यामुळे त्याला दिवसभर डोकेदुखीने हैराण केले.” 

या कार्यक्रमात पुढे रितेश देशमुखने सांगितले की, ते संपूर्ण अ‍ॅक्शन दृश्य अहमदने स्वतः डिझाइन केले होते. अहमद खूपच चांगला दिग्दर्शक आहे. पण त्याचसोबत त्याच्यात एक कला आहे ते म्हणजे तो नकला खूप छान करतो. आम्ही दोघे शत्रुघ्न सिन्हा, आमिर खान, राम गोपाल वर्मा यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांच्या नकला सेट्सवर करून खूप धमाल करायचो.

टॅग्स :टायगर श्रॉफबागी ३