Join us  

लॉकडाऊनमध्ये दिशा पटानी नव्हे तर या खास व्यक्तीसोबत टायगर श्रॉफ घालवतोय क्वॉलिटी टाईम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 11:57 AM

टायगर सध्या मुंबईमध्येच असून सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय आहे.

ठळक मुद्देटायगर जास्तीत जास्त वेळ त्याच्या कुटुंबियांना देत असून त्याची बहीण कृष्णा श्रॉफसोबत क्वॉलिटी टाईम घालवत आहे. टायगरची आई आयशा श्रॉफने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. खबरदारी म्हणून भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केला आहे. त्यामुळे २१ दिवस देशातील सगळेच कामकाज ठप्प झाले आहे. चित्रपटांचे चित्रीकरण बंद असल्याने सामान्य लोकांसोबतच सेलिब्रेटी देखील आपापल्या घरी आहेत. प्रेक्षकांना लाडका टायगर श्रॉफ सध्या मुंबईतील त्याच्या घरी असून त्याचे वडील अभिनेते जॅकी श्रॉफ त्यांच्या पुण्यातील घरात आहेत.

टायगर जास्तीत जास्त वेळ त्याच्या कुटुंबियांना देत असून त्याची बहीण कृष्णा श्रॉफसोबत क्वॉलिटी टाईम घालवत आहे. टायगरची आई आयशा श्रॉफने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत टायगर आणि कृष्णा आपल्याला पाहायला मिळत असून त्यांचा हा बुमरँग व्हिडिओ आहे. त्यासोबत आयशाने कॅप्शन लिहिले आहे की, हे दोघे माझे सर्व काही आहेत.. माझ्या मुलांना नेहमीच देवाचा आशीर्वाद लाभो....

आयशाने शेअर केलेला हा व्हिडिओ टायगरच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. या व्हिडिओला ते लाईक करत असून त्यावर भरभरून कमेंट करत आहेत. केवळ सामान्य लोकांनीच नव्हे तर कृष्णाने देखील या पोस्टवर कमेंट केली आहे. या व्हिडिओसाठी तिने आईचे आभार मानले आहेत तर तिच्या बॉयफ्रेंडने हात जोडतानाची इमोजी पोस्ट केली आहे.

टायगर आणि दिशा पटानी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा नेहमीच मीडियात ऐकायला मिळतात. पण त्या दोघांनी यावर नेहमीच मौन पाळणेच पसंत केले आहे. काही दिवसांपूर्वी कृष्णासोबतचा दिशाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात दिशा आणि कृष्णा मजा-मस्ती करताना दिसले होते. दिशा ही टायगरचीच नव्हे तर कृष्णाची देखील खूप चांगली फ्रेंड आहे.

  

टॅग्स :टायगर श्रॉफ