टायगर सगळ्यात फिट -दिनो मोरीया
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:34 IST
टायगर सगळ्यात फिट -दिनो मोरीयामॉ डेल ते अभिनेता असा प्रवास करणारा दिनो मोरीया सध्या चित्रपटांमध्ये फारसा दिसत नाही. ...
टायगर सगळ्यात फिट -दिनो मोरीया
टायगर सगळ्यात फिट -दिनो मोरीयामॉ डेल ते अभिनेता असा प्रवास करणारा दिनो मोरीया सध्या चित्रपटांमध्ये फारसा दिसत नाही. परंतू तरीही त्याच्या फिटनेस बाबत आणि पिळदार शरीराबाबत बॉलीवुडमध्ये नेहमीच चर्चा सुरू असतात. नुकतेच एका कार्यक्रमात बोलताना दिनो म्हणाला, 'टायगर आणि मी एकाच शाळेत होतो आणि बास्केटबॉल टीममध्ये एकत्र खेळायचो. मला त्याची फिटनेस लेव्हल माहित आहे. आणि मला असे वाटते क ी सगळ्यात फिट युवकांपैकी तो एक आहे. टायगर प्रमाणेच अक्षयकुमारचा फिटनेसही कमालीचा आहे.' फिल्म इंडस्ट्रीमध्ये सिक्स आणि एट पॅकचे कल्चर दिनोनेच आणले. फिटनेसच्या आवडीपायीच दिनोने मुंबईत तब्बल पंधरा ठिकाणी मोफत फिटनेस स्टेशन्स उघडले आहेत जेथे बेसिक व्यायाम करता येऊ शकतो.