Join us

टायगर शिकला कलरीपायट्टु

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2016 10:47 IST

‘बागी’ या चित्रपटासाठी टायगर श्राफ कठोर मेहनत घेतोय. चित्रपटात कुठलीही कसर राहायला नको, हाच टायगरचा प्रयत्न आहे. त्याचमुळे टायगरने ...

‘बागी’ या चित्रपटासाठी टायगर श्राफ कठोर मेहनत घेतोय. चित्रपटात कुठलीही कसर राहायला नको, हाच टायगरचा प्रयत्न आहे. त्याचमुळे टायगरने या चित्रपटासाठी कलरीपायट्टुचे प्रशिक्षण घेतले. २०१४ मध्ये  प्रदर्शित ‘हीरोपंती’ या चित्रपटाद्वारे टायगरने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. आता त्याच्या चाहत्यांना ‘बागी’ची प्रतीक्षा आहे. साजिद नाडियाडवाला निर्मित आणि शब्बीर खान दिग्दर्शित या चित्रपटात टायगरच्या अपोजिट श्रद्धा कपूर दिसणार आहे.‘बागी’मध्ये मार्शल आर्टची अनेक अ‍ॅक्शन दृश्य आहेत. कलरीपायट्टु हे मार्शल आर्टसारखे एक टेनिंग आहे.