Join us  

Amitabh Bachchan आणि Aamir Khan यांनाही जमले नाही हे काम,शेवटी 'ती' व्यक्ती आली Katrina Kaif च्या मदतीला धावून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:43 PM

'ठग्स ऑफ हिंदोस्तान' सिनेमाचा ट्रेलरआता पर्यंत 27 मिलियन लोकांनी बघितले आहे. जो स्वत:मध्ये एक मोठा रेकॉर्ड आहे. ठग्सच्या ट्रेलर यूट्यूबवर सुद्धा प्रेक्षकांच्या चांगली पसंती मिळतेय. 2.7 कोटी लोकांनी ट्रेलर बघितला आहे.

बहुप्रतिक्षित सिनेमा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'चा नुकताच ट्रेलर लॉन्च झाला आहे. या ट्रेलर लॉन्चला सिनेमाची स्टारकास्ट उपस्थित होती. अवघ्या काही तासांतच या सिनेमाच्या ट्रेलरला भरघोस पसंती मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. या ट्रेलरला आता पर्यंत 27 मिलियन लोकांनी बघितले आहे. जो स्वत:मध्ये एक मोठा रेकॉर्ड आहे. ठग्सच्या ट्रेलर यूट्यूबवर सुद्धा प्रेक्षकांच्या चांगली पसंती मिळतेय. 2.7 कोटी लोकांनी ट्रेलर बघितला आहे. या ट्रेलरबरोबर आणखी एक व्हीडीओ सा-यांचे लक्ष वेधून घेत आहे.

त्याचे झाले असे की,'ठग्स ऑफ हिंदोस्तान' ट्रेलर लॉन्च वेळी एक मजेशीर किस्सा घडला. ट्रेलर लॉन्चिंगला सगळेच स्टारकास्ट स्टेजवर जमले होते. तेवढ्यात अचानक कॅटरिना कैफची एंट्री होते. अगदी त्यावेळी अचानक तिच्या एका कानातला झुमका खाली पडतो. कॅटरिनाच्या लक्षात येताच तिच्या सोबत आमिर खान आणि अमिताभ बच्चनही झुमका शोधायला सुरूवात करतात. मात्र आमिर आणि अमिताभ यांना काही हा झुमका दिसत नाही. थोड्याच वेळात एका क्रु मेंबर पैकी एका व्यक्तीला कॅटरिनाचा हा हरवलेला झुमका सापडतो. हरवलेला झुमका मिळताच कॅटरिनाही खूप खुश होते. मात्र या झुमक्याची सुरू असलेली शोध मोहीम पाहून ''झुमका गिरा रे'' या गाण्याची आठवण झाल्या शिवाय राहत नाही.

हा सिनेमा विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित करत असून आमिर, अमिताभ यांच्यासोबतच या सिनेमात सना शेख आणि कॅटरिना कैफ यांच्या मुख्य भूमिका आहेत. या सिनेमाच्या निर्मात्यांनी निर्मितीत कोणतीही कसर शिल्लक राहू नये याची काळजी घेतली आहे.  या सिनेमाच्या आऊटडोअर चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला असल्याची चर्चा आहे. या सिनेमाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण माल्टा येथे करण्यात आले होते. 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' हा सिनेमा फिलिप मेडोस टेलर यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग अँड द कल्ट ऑफ द ठगी’ या कादंबरीवर आधारित आहे. येत्या 9 नोव्हेंबरला या सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

 

टॅग्स :ठग्स आॅफ हिंदोस्तानअमिताभ बच्चनकतरिना कैफआमिर खान