Join us  

Throwback Video: ऐश्वर्या राय दिसली अमिताभ बच्चन यांच्यासोबत, का वागत होती विचित्रासारखी?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 4:09 PM

सोशल मीडियावरील या व्हिडिओत अमिताभ बच्चन ऐश्वर्याला चक्क आराध्यासारखे वागू नकोस असे बोलताना दिसत आहेत.

ठळक मुद्देपुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ प्रचंड खूश असून त्यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत ते आभार व्यक्त करताना दिसत आहेत तर दुसरीकडे ऐश्वर्या मजा-मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहे. ती जोराजोरात हसत असून अमिताभ बच्चन मीडियाशी बोलताना त्यांना अलिंगन देताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या चाहत्यांची संख्या कमी नाही. ऐश सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसली तरी तिचे फोटो आणि व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात. सध्या ऐश्वर्याचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या आपल्याला अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसत आहे. हा व्हिडिओ 2016 मधील असून या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

सोशल मीडियावरील या व्हिडिओत अमिताभ बच्चन ऐश्वर्याला चक्क आराध्यासारखे वागू नकोस असे बोलताना दिसत आहेत. हा व्हिडिओ एका पुरस्कार सोहळ्यातील असून या पुरस्कार सोहळ्यात अमिताभ आणि ऐश्वर्या या दोघांनाही पुरस्कार मिळालेला होता. पुरस्कार मिळाल्यानंतर ते दोघे मीडियाशी बोलताना दिसत आहेत. एशियानेटने दिलेल्या वृत्तानुसार, पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ प्रचंड खूश असून त्यांना मिळालेल्या पुरस्काराबाबत ते आभार व्यक्त करताना दिसत आहेत तर दुसरीकडे ऐश्वर्या मजा-मस्तीच्या मुडमध्ये दिसत आहे. ती जोराजोरात हसत असून अमिताभ बच्चन मीडियाशी बोलताना त्यांना अलिंगन देताना आणि किस करताना दिसत आहे. त्यावर अमिताभ आराध्यासारखी वागू नकोस असे तिला म्हणत आहेत. हे ऐकून उपस्थित जोराजोरात हसताना दिसत आहेत. त्यावर ऐश्वर्या हसत अमिताभ यांना अलिंगन देत तुम्हाला माहीतच आहे असे म्हणताना दिसत आहे.

या व्हिडिओत अमिताभ आणि ऐश्वर्या यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल आराध्याची प्रतिक्रिया काय आहे. तसेच तुम्ही चार किएटिव्ह लोक घरात असताना घरातील वातावरण कसे असते हे विचारताना दिसत आहेत. त्यावर चार नाही तर आम्ही पाच किएटिव्ह लोक आहोत... आराध्याचा देखील त्याच समावेश असल्याचे ते म्हणत आहेत. 

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअमिताभ बच्चन