Join us  

अजय देवगन सोबत काम करायला 'या' अभिनेत्री घाबरतात ? आजवर कधीही केले नाही त्याच्यासोबत काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 5:43 PM

'तान्हाजी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली मोहोर उमटवतच असताना स्कोर ट्रेंड इंडियाच्या लोकप्रियतेच्या चार्टवरही लोकप्रियतेच्या यादीत अजय देवगन नंबर वनस्थानी विराजमान झाला.

बॉलीवूडमधला ‘मिस्टर डिपेंडेबल’ म्हणून ओळखला जात असलेल्या अभिनेता अजय देवगनचा तान्हाजी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली मोहोर उमटवतच असताना स्कोर ट्रेंड इंडियाच्या लोकप्रियतेच्या चार्टवरही लोकप्रियतेच्या यादीत अजय देवगन नंबर वनस्थानी विराजमान झाला. लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत अजय देवगनचा समावेश असला तरीही काही  अभिनेत्री आहेत ज्या त्याच्यासह काम करायला घाबरतात. 

हे वाचून तुम्हाला विश्वासच बसला नसणार. दिवसेंदिवस अजयची लोकप्रियता वाढत असली तरी या अभिनेत्रींसाठी अजयची इमेज आजही तिच आहे. अजयसोबत काम न करणा-या अभिनेत्रींची लिस्टही तशी मोठीच आहे. यात पहिल्या क्रमांकावर आहे बॉलिवूडची पिग्गी चॉप्स प्रियंका चोप्रा.  प्रियंकाने  तिच्या  संपूर्ण फिल्मी करिअरमध्ये अजय देवगणसोबत कधीही काम केले नाही. अनेक आफर्सही आल्या पण त्या प्रियंकाने स्वतःहून रिजेक्ट केल्याचे बोलले जाते.

दुसरे नाव आहे कतरिना कैफ. बॉलिवूडचा दबंग सलमानसोबत कतरिना कैफने अनेक हिट सिनेमे दिले आहेत. फार कमी लोकांना माहिती असेल 'सिंघम' सिनेमासाठी पहिली पसंत कतरिना होती पण तिने यासाठी नकार दिला आणि तिची भूमिका काजल अग्रवालने साकारली.

तिस-या क्रमांकावर आहे दीपिका पदुकोण.बॉलिवूडची मस्तानी म्हणून ओळखली जाणा-या दीपिकाने हिटवर हिट सिनेमे दिले असले तरी ती अजय देवगनच्या सिनेमात काम करण्यासाठी तिने आजपर्यंत होकार दिला नाही. दीपिकाची स्वतःची एक चॅाईस आहे तिने आजवर सलमानसोबतही कधी काम केलेले नाही. आता या सगळ्या अभिनेत्री अजयला नाकारतात यामागचे कारणही अजूनही समोर आलेले नाही. 

 

टॅग्स :अजय देवगणप्रियंका चोप्रा