Join us

​‘ते कॅमेरे’ दिसताच घाबरली श्रीया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 11:49 IST

बॉलिवूड स्टार अभिनय करताना कॅमºयासमोर सहज वावरत असले तरी कधी कधी त्यांना याच कॅमेºयांची भिती वाटते. असेच काही घडले ...

बॉलिवूड स्टार अभिनय करताना कॅमºयासमोर सहज वावरत असले तरी कधी कधी त्यांना याच कॅमेºयांची भिती वाटते. असेच काही घडले अभिनेत्री श्रीया सरन सोबत. तुम्ही म्हणाल कॅमेºयासमोर दर्जेदार अभिनय करणारी श्रीया घाबरली तरी का? हे कॅमेरे होते मीडियाचे! मीडियाला पाहून वेगवेगळे पोझ देणारे स्टार्सचे बिग फु टते तेव्हा ते घाबरतातच ना! असेच श्रीयाचेही झालेय.  श्रीया नुकतीच एका क्रिकेटरसोबत सिक्रेट लंच डेटवर गेली होती. त्यावेळी हॉटेलमधून बाहेर पडताना श्रीया व तिचा क्रिकेटर बॉयफ्रें ड (कथित) मीडियाच्या कॅमेºयात कैद झाले. अचानच कॅमेºयांचे लाईट्स तिच्यावर पडताच ती जरा थबकली. मात्र तिचा बॉयफ्रें ड काही झालेच नाही असा वागत होता. श्रीयाचा हा बॉयफ्रें ड म्हणजे वेस्टइंडिजचा स्टार क्रिकेटर डेव्हेन ब्राव्हो. डेव्हेन सध्या ‘तुम बिन 2’ च्या एका स्पेशल व्हिडीओच्या शूटिंगसाठी भारतात आला आहे. सोबतच तो एका रिआलिटी शोचा एपिसोडदेखील शूट करणार आहे. आपल्या शूटिंगचा शेड्युल संपवून श्रीया व डेव्हेन दोघेही लंच डेटवर गेले होते. एका वेबपोर्टलने दिलेल्या माहितीनुसार श्रीया व डेव्हेन यांची ओळख बरीच जुनी आहे. आयपीएल-4 च्या उद्घाटन सोहळ्याला श्रीयाने शाहरुख सोबत परफार्म केले होते. त्यावेळी डेव्हेन चेन्नई सुपर किंगकडून खेळत होता. त्यावेळी त्यांची मैत्री झाली असावी. मात्र सिक्रे ट लंच अन् कॅमेºयांना पाहून घाबरने बरेच काही सांगून जाते बरं का श्रीया!