Join us  

"बॉयोपिक साकारताना दडपण जास्त असते"

By गीतांजली | Published: September 12, 2018 11:35 AM

'फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’मध्ये आपल्या अभिनयाने रिचा चिड्डाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सिनेमात बोल्ड भूमिका साकारणारी  रिचा रिअल लाइफमध्येही तेवढीच बोल्ड आहे.

ठळक मुद्दे''सिनेमा पाहिल्यानंतर लोकांचे विचार थोडेफार तरी बदलतील'' ''कायद्यामध्ये थोडे फार बदल होणे गरजेचे आहे''

गीतांजली आंब्रे 

'फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’मध्ये आपल्या अभिनयाने रिचा चिड्डाने  प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सिनेमात बोल्ड भूमिका साकारणारी  रिचा रिअल लाइफमध्येही तेवढीच बोल्ड आहे. लवकरच तिचा लव्ह सोनिया हा देह विक्री करणाऱ्या महिलांचे भीषण वास्तव दाखवणारा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. त्यानिमित्ताने रिचाशी साधलेला दिलखुलास संवाद. 

तू या सिनेमासाठी कशा पद्धतीचे रिसर्च केले आहेस ?रिसर्च तर मी माझ्या प्रत्येक सिनेमासाठी करते मात्र हा वास्तववादी सिनेमा असल्याने याच्यासाठी जास्त रिसर्च करावे लागले. देह विक्री करणाऱ्या काही महिलांना मी प्रत्यक्षात जाऊन भेटले, त्यांच्याशी बोलले. सिनेमातील माझी भूमिका दोन ते तीन मुलांच्या आयुष्याला एकत्र करुन उभी करण्यात आली आहे त्यामुळे माझी भूमिका खूप वास्तवाशी अनुरुप अशी आहे. 

शूटिंग दरम्यान तुझा मनावर त्याचा ऐवढा परिणाम झाला होता की, यातून बाहेर येण्यासाठी तुला मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली ?हो खरं आहे, मला काही थेरपी घ्याव्या लागल्या शूटिंग संपल्यावर यातून बाहेर निघण्यासाठी. कारण एखादी भूमिका साकारताना तुम्ही त्यात स्वत:ला इतकं झोकून दिलेले असते की त्यातून बाहेर यायला तुम्हाला वेळ लागतो. मी याआधी ही मसान आणि गँग ऑफ वासेपूर सारखे सिनेमांमध्ये काम केले आहे. मात्र त्यावेळी माझ्यावर मनावर एवढ्या खोलवर परिणाम झाला नव्हता जेवढा ही भूमिका साकारताना झाला. मी काही म्युझिक थेरपी घेतल्या लव्ह सोनियाचे शूटिंग संपल्यानंतर. 

सिनेमा पाहिल्यानंतर देह विक्री करणाऱ्या महिलांकडे समाजाच्या बघायचा दृष्टीकोन बदलेले असे तुला वाटते का ?मला वाटते थोडा तरी लोकांचे विचार बदलतील हा सिनेमा पाहिल्यानंतर. कारण आजही समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन फारच वेगळा आहे. मी देह विक्री करणाऱ्या महिलांना बघितले ज्या आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पार पाडतात. मुलांना शिकवता त्यांना मोठे करतात. थोडे कायद्यामध्ये देखील बदल झाले पाहिजेत जे सरकारी पोलिस खात्यातील लोक यासगळ्या रॅकेटमध्ये सामील असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे.  

शकिला सिनेमाची शूटिंग सध्या सुरु आहे, त्यातली भूमिका साकारताना तुला कोणत्या प्रकारचे चॅलेंजेस येतायेत ?हा सिनेमा बॉयोपिक असल्याने जबाबदारी थोडी जास्त वाढली आहे. शूटिंग सध्या सुरु आहे आणि सिनेमा चांगला बनतोय. 90 च्या दशकावर आधारित हा सिनेमा आहे कारण शकिला यांचा स्टारडम त्यावेळी जास्त होते. मी या सिनेमाला घेऊन खूप उत्सुक आहे. सिनेमा थोडाफार कॉन्ट्रोव्हर्शल देखील असणार आहे कारण शकिला यांचे व्यक्तिमत्त्व तसे आहे. मी त्यांची जाऊन भेट देखील घेतली त्या फारच बिनधास्त आहेत.   

टॅग्स :रिचा चड्डालव्ह सोनिया