Join us  

१५ व्या वर्षी या मराठी अभिनेत्रीने केला होता रेप सीन, अशी झाली होती तिची अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 4:36 PM

सिनेमात त्यांना चक्क रेप सीन करावा लागणार असे दिग्दर्शकाने सांगताच त्यांच्या पाया खालचीच जमीन घसरली.

हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे. हिंदीत बालकलाकार ते यशस्वी अभिनेत्री म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.  पद्मिनीचा यांचा जन्म १ नोव्हेंबर १९६५ मध्ये झाला. त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले तेव्हा तिचा चेहरा खूपच नाजूक होता. त्यामुळे दिग्दर्शकांनी त्यांना  बालकलाकार म्हणून संधी दिली. 

पद्मिनी कोल्हापुरे यांची भूमिका असलेल्या 'इन्साफ का तराजू', 'आहिस्ता आहिस्ता',  'प्रेमरोग', 'विधाता', 'प्यार झुकता नहीं', 'सौतन', 'वो सात दिन' यासह विविध सिनेमांनी रसिकांच्या मनावर गारूड घातलं. मराठीतही त्यांच्या अभिनयाची जादू पाहायला मिळाली. 'चिमणी पाखरं' आणि 'मंथन' या सिनेमातून त्यांनी मराठी रुपेरी पडद्यावरही छाप पाडली. 

भूमिकेसाठी कलाकारांना कधी कधी मनाविरूद्धही काम करावे लागते. असेच काही  पद्मिनी कोल्हापुरे यांच्याबरोबरही घडले.  'इन्साफ का तराजू' या सिनेमात त्यांना चक्क रेप सीन करावा लागणार असे दिग्दर्शकाने सांगताच त्यांच्या पाया खालचीच जमीन घसरली. कारण हा सीन तब्बल ५ ते ६ मिनिटांचा होता. त्यावेळी  पद्मिनी कोल्हापुरे खूप घाबरल्या होत्या  रेप सीन करायला त्यांच्या मनाची तयारी होत नव्हती. 

त्यावेळी सेटवर पद्मिनी कोल्हापुरे यांच्या आईंनी पद्मिनीची समजूत घातली.आईने दिलेल्या ह्या धीरामुळेच पद्मिनी कोल्हापुरे सीनसाठी तयार झाल्या होत्या. विशेष म्हणजे ज्यावेळी हा रेप सीन शूट करण्यात आला होता. तेव्हा त्या फक्त 15 वर्षाच्या होत्या. हा सिनेमा जेव्हा रूपेरी पडद्यावर आला तेव्हा सर्वच स्थरावरून पद्मिनीचे विशेष कौतुक करण्यात आले. या रेप सीननंतर एक कलाकार म्हणून अधिक समृद्ध झाल्याचे पद्मिनी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते. 

आता पुन्हा एकदा पद्मिनी मराठीत झळकणार आहे. ‘प्रवास’ या चित्रपटात अशोक सराफ आणि लोकप्रिय अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे प्रथमच एकत्र काम करणार आहेत. यासोबत विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकर आदि कलाकारांच्या यात भूमिका आहेत. मानवी नातेसंबंध अधोरेखित करतानाच यश आणि नातं या दोन गोष्टींचा ‘प्रवास’ या चित्रपटातून उलगडणार आहे.

टॅग्स :पद्मिनी कोल्हापुरे