Join us

अद्याप एकही चित्रपट नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 11:38 IST

२0१५ हे वर्ष दीपिकासाठी खूपच बिझी ठरले. यावर्षी तिचे अनेक चित्रपट आले. पुढील वर्षासाठी मात्र तिने अद्याप एकही चित्रपट ...

२0१५ हे वर्ष दीपिकासाठी खूपच बिझी ठरले. यावर्षी तिचे अनेक चित्रपट आले. पुढील वर्षासाठी मात्र तिने अद्याप एकही चित्रपट साईन केलेला नाही. आलेले प्रस्ताव विशेष नसल्याने पुढील वषार्साठी अद्याप चित्रपट स्वीकारला नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. ह्यधूम 4 आणि शुद्धी असे बिग बजेट चित्रपट तिने नाकारल्याची चर्चा आहे. सध्या मी करिअरच्या अशा टप्प्यावर आहे, जेथे टिकून राहण्यासाठी प्रत्येक चित्रपट केलाच पाहिजे, असे नाही. केवळ चित्रपटाच्या घोषणेपुरते एखाद्या प्रोजेक्टचा भाग म्हणून मिरवण्यात मला रस नाही. गेल्या काही दिवसांत मी अनेक चित्रपटांच्या स्क्रिप्ट वाचल्या. पण त्यात दम नसल्याने गोष्ट पुढे गेली नाही, असे दीपिका सांगते. २0१५ मध्ये दीपिकाच्या नावावर ३ चित्रपट आहेत. अमिताभ बच्चन आणि इरफान खान यांच्यासोबत ह्यपीकूमध्ये तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबतचा ह्यतमाशा फारसा चालला नाही. आजघडीचा दीपिकाचा बॉयफ्रेंड रणवीरसिंग याच्यासोबतचा ह्यबाजीराव मस्तानी वाद-विवादामुळे चर्चेत आहे. याबद्दल दीपिका म्हणाली, ह्यहे तिन्ही चित्रपट कमालीचे भिन्न होते. अभिनेत्री म्हणून एकाच वेळी अशा चित्रपटांमध्ये काम करणे सोपे नसते. या वर्षीच्या कामाबाबत मी समाधानी आहे.