Join us  

Then and Now: असा केला स्वतःमध्ये कायापालट, पाहा आधी कशी दिसायची तुमची लाडकी शिल्पा शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 1:44 PM

फिट राहण्यासाठी शिल्पा शेट्टी खूप मेहनत घेते हे तर जगजाहीर आहे. योगाभ्यास आणि वर्कआऊटचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अनेक गोष्टी करताना अभिनेत्री दिसतात. काळ बदललाय आणि स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब लक्षात घेवूनच अनेकदा अभिनेत्री त्यांचे मेकओव्हर करताना दिसतात. मेकओव्हर केल्यामुळे त्यांच्यात झालेला कायापालट पाहून अनेकदा आश्चर्याचा धक्काच बसतो.

असाच एक शिल्पा शेट्टीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोत अगदी करिअरच्या सुरुवातीला दिसणारी शिल्पा शेट्टी आणि आत्ताची शिल्पा शेट्टी दोन्ही फरक पाहायला मिळत आहे. पूर्वीचा फोटो पाहून अनेकांना विश्वासच बसणार नाही. इतका सामान्य तिचा लूक होता. जुन्या फोटोंमध्ये आणि आत्ताच्या फोटोमध्ये तिच्यातील कायापालट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. 

मात्र सुंदर दिसण्यासाठी फिट राहण्यासाठी शिल्पा खूप मेहनत घेते हे तर जगजाहीर आहे.  योगाभ्यास आणि वर्कआऊटचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या या व्हिडीओपासून अनेकांना वर्कआऊटची प्रेरणा मिळाली असेल आणि तेही फिटनेसबाबत सजग झाले असतील.

नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास तिच्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. वजन कमी करणे, स्टायलिश दिसणे कोणाला नाही आवडणार त्यामुळे शिल्पा शेट्टीचा हा फोटो तुम्हालाही नक्कीच प्रेरणा देईल हे मात्र नक्की.सोशल मीडियावरील  शिल्पाचे नवीन अवताराताली फोटो तिच्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय  ठकत असतात. 

इन्स्टाग्राम अकाउंटवर तुम्ही नजर टाकली असता तुम्हाला तिचे वेगवेगळ्या अंदाजातील ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतील. दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. तिच्या प्रत्येक अंदाजातील फोटोंना खूप लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्याचे पाहायला मिळते.

शिल्पा शेट्टी सध्या तिच्या कुटुंबियांसह क्वॉलिटी टाईम मस्त एन्जॉय करताना दिसते. शिल्पा सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. मुलांसोबत पतीसोबतचे फोटो आणि व्हिडीओ ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

 

सोशल मीडियावर तिच्या व्हिडीओंना पसंती देखील चांगलीच मिळते. शिल्पाने बॉलिवूड अभिनयासोबत आपल्या डान्ससाठी देखील ओळखली जाते. अनेक डान्स रिअलिटी शोमध्ये तिने जजची भूमिका देखील साकारली आहे.

टॅग्स :शिल्पा शेट्टी