Join us

चाहत्यांनो धन्यवाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 12:07 IST

चाहत्यांनो धन्यवाद!बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचे ट्विटरवर १२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. या चाहत्यांना प्रियांकाने धन्यवाद दिले आहेत. बाजीराव ...

चाहत्यांनो धन्यवाद!बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचे ट्विटरवर १२ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. या चाहत्यांना प्रियांकाने धन्यवाद दिले आहेत. बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या प्रदर्शनावरून सुरू झालेल्या वादामुळे तिने याकडे लक्ष दिले नव्हते. मात्र, बाजीराव मस्तानी प्रदर्शित झाल्यानंतर तिला फॉलो करणार्‍यांची संख्या १२ दशलक्ष झाली आहे. तिच्या अमेरिकन टीव्ही मालिका क्वाँटिकोलाही रसिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. आता ती आंतरराष्ट्रीय चेहरा ठरली आहे. चाहत्यांमुळेच आपल्याला ताकद मिळते. त्यामुळे मी चाहत्यांना धन्यवाद देते, असे प्रियांकाने म्हटले आहे. आपल्या सगळ्य़ांच्या प्रेमामुळेच मला बाजीराव मस्तीनी चित्रपटात दमदार अभिनयाची प्रेरणा मिळाली, असेही प्रियंकाने नमूद केले आहे.