Join us  

'थलायवी' सिनेमात MGR यांची भूमिका साकारणा-या अभिनेत्याचा पहिला लूक आला समोर, ओळखणंही आहे कठिण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 6:51 PM

जयललिता यांच्या कठिण प्रसंगी एमजीआर यांनी त्यांना साथ दिली. जयललिता यांच्या आयुष्यात मारुदुर गोपालन रामचन्द्रन यांचा सहभाग प्रत्येक वळणावर अतिशय महत्वाचा होता.

कंगणा राणौत गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'थलायवी' सिनेमामुळे चर्चेत आहे. जयललिता यांच्या आयुष्यावर बनवण्यात आलेल्या सिनेमात कंगणा मुख्य भूमिकेत आहे. जयललिता यांच्या लूकप्रमाणेच कंगणाचे सिनेमात लूक असणार आहे. विविध टप्प्यातील जयललिता यांच्या लूक सारखेच कंगणाचे लूक वेळोवेळी चाहत्यांसह शेअर करण्यात आले होते. जयललिता यांच्या रूपात कंगणाला तुफान पसंती मिळाली. जयललिता यांच्या आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती होती  एमजीआर. 

जयललिता यांच्या कठिण प्रसंगी एमजीआर यांनी त्यांना साथ दिली. जयललिता यांच्या आयुष्यात मारुदुर गोपालन रामचन्द्रन यांचा सहभाग प्रत्येक वळणावर अतिशय महत्वाचा होता.त्यामुळे त्यांची भूमिका सिनेमात कोणता अभिनेता साकारणार याकडेच चाहत्यांचे लक्ष लागले होते. अखेर चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर त्यांना मिळाले आहे.

 

एमजीआर यांच्या पुण्यतिथीनिमित्त थलायवीच्या टीमने अभिनेत्याचा लूक प्रदर्शित केला आहे. अरविंद स्वामी सिनेमात एमजीआर यांची भूमिका साकारत आहेत. या लूकमध्ये अरविंद स्वामीला ओळखणे देखील कठीण जात आहे. अरविंद स्वामीने कित्येक किलो वजन कमी केले असून तो या लूकमध्ये खूपच वेगळा दिसत आहे.अरविंद स्वामी यांनी यापूर्वी 'रोजा' आणि 'बॉम्बे' या सिनेमातही झळकले आहेत. अरविंद स्वामी १५ वर्षं तरी चित्रपटसृष्टीपासून दूर होते. पण 'डिअर डॅड' या चित्रपटाद्वारे  2016 मध्ये अभिनयक्षेत्रात कमबॅक केले होते. 

अरविंद स्वामीला अभिनयात नव्हे तर बिझनेसमध्ये रस असल्याने त्यांनी अभिनयक्षेत्राला 2000 मध्ये रामराम ठोकला. अभियापेक्षा व्यवसायात व्यग्र असताना 2005 मध्ये त्यांचा एक भीषण अपघात झाला आणि या अपघातात त्यांच्या पाठीच्या कण्याला दुखापत झाली. त्यात त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे अनेक वर्षं व्हिलचेअरवर होते.

 

चार ते पाच वर्षं उपचार घेतल्यानंतर ठणठणीत बरे झाले. पण या दरम्यान त्यांचे वजन वाढले होते. त्यांनी चित्रपटसृष्टीत कमबॅक करण्यासाठी मोठ्या मेहनतीने जवळजवळ 15 किलो वजन कमी केले .

टॅग्स :थलायवीअरविंद स्वामी