Join us  

Teaser Poster: ‘प्रेम रतन धन पायो’नंतर राजश्री प्रॉडक्शन घेऊन येतोय ‘हम चार’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 3:44 PM

कौटुंबिक चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राजश्री प्रॉडक्शनने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. होय, राजश्री ‘हम चार’ नावाचा चित्रपट घेऊन येतोय आणि आपल्या आधीच्या चित्रपटांची परंपरा राखत, राजश्रीचा हा चित्रपटही एक कौटुंबिक चित्रपट असणार आहे.

ठळक मुद्देआज या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला. ‘फ्रेन्ड्स भी फॅमिली आहे,’अशी या चित्रपटाची टॅग लाईन आहे.

कौटुंबिक चित्रपट बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राजश्री प्रॉडक्शनने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. होय, राजश्री ‘हम चार’ नावाचा चित्रपट घेऊन येतोय आणि आपल्या आधीच्या चित्रपटांची परंपरा राखत, राजश्रीचा हा चित्रपटही एक कौटुंबिक चित्रपट असणार आहे. आज या चित्रपटाचा फर्स्ट लूक जारी करण्यात आला. ‘फ्रेन्ड्स भी फॅमिली आहे,’अशी या चित्रपटाची टॅग लाईन आहे.

चित्रपटात चार मित्रांची कथा दाखवली जाणार आहे. एक फिमेल लीड आणि उर्वरित तीन मेल अ‍ॅक्टर्स. अभिषेक दीक्षित हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत. सूरज बडजात्या हे या चित्रपटाचे क्रिएटीव्ह प्रोड्यूसर आहेत. पुढील वर्षी २०१९ मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.राजश्रीचा याआधीचा चित्रपट होता,‘प्रेम रतन धन पायो’. २०१५ मध्ये रिलीज झाला होता. यानंतर तीन वर्षांनी राजश्रीने नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. साहजिकच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तीन वर्षांपूर्वी आलेल्या ‘प्रेम रतन धन पायो’मध्ये सोनम कपूर आणि सलमान खान लीड रोलमध्ये दिसले होते. ‘प्रेम रतन धन पायो’ने बॉक्सआॅफिसवर २०० कोटी रूपयांचा बिझनेस केला होता. त्यापूर्वी राजश्रीने मैनें प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है अशा चित्रपटांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. राजश्रीच्या या सर्व चित्रपटात सलमान लीड रोलमध्ये होता. त्यामुळे ‘हम चार’मध्ये कुणाची वर्णी लागते, ते पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. किमान लीड रोल नाही तर या चित्रपटात सलमानचा स्पेशल अपीअरन्स असणार, इतकी अपेक्षा तर आपण करूच शकतो.

टॅग्स :हम चारसलमान खान