Join us  

का? कारण तो श्रीमंत आहे? ललित मोदी- सुष्मिता सेनच्या रिलेशनशिपवर तस्लिमा नसरीन यांची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 12:46 PM

Taslima Nasrin Slams Sushmita Sen: सुष्मिता व ललित मोदींच्या लव्ह अफेअरवर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी प्रतिक्रिया देत, सुष्मितावर जोरदार निशाणा साधला आहे.

Taslima Nasrin Slams Sushmita Sen : सुष्मिता सेन (Sushmita Sen) व ललित मोदींच्या (Lalit Modi  ) रिलेशनशिपवर सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी सुष्मिताला पाठींबा दिला आहे तर काहींनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. आता सुष्मिता व ललित मोदींच्या लव्ह अफेअरवर बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन (Taslima Nasrin ) यांनी प्रतिक्रिया देत, सुष्मितावर जोरदार निशाणा साधला आहे.

तस्लिमा यांनी 15 जुलैला याबद्दलचं पहिलं  ट्विट केलं होतं. गेल्या 15 जुलैला ललित मोदींनी सुष्मितासोबतचे रोमॅन्टिक फोटो शेअर करत, ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहिर केलं होतं. सुष्मिताला अशा कुठल्याही पुरूषाची गरज नाही, असं तस्लिमा यांनी आपल्या  ट्विटमध्ये म्हटलं होतं. आता तस्लिमा यांनी फेसबुकवर बंगाली भाषेत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी सुष्मितावर पैशांसाठी विकली गेल्याचा आरोप केला आहे.

तस्लिमांची एफबी पोस्ट

‘मी पहिल्यांदा सुष्मिताला कोलकाता एअरपोर्टवर भेटले होते. तिने मला मिठी मारत, आय लव्ह यू म्हटलं होतं. जिथून मी येते, तिथे माझ्यापेक्षा मोठं कुणीही नाही. पण त्यादिवशी मी सुष्मितासमोर स्वत:ला लहान भासू लागले होते. त्या दिवशी तिच्या सुंदर चेहºयावरून माझी नजर हटत नव्हती. तिची पर्सनॅलिटी मला खूप आवडली. तिने तरूण वयात दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. तिचा प्रामाणिकपणा, तिची हिंमत, तिचे ठाम विचार मला आवडतात. पण आता सुष्मितान अनेक गुन्ह्यांत सहभागी असलेल्या का कुरूप माणसासोबत वेळ घालवते आहे. का? कारण तो श्रीमंत आहे? काय ती पैशांसाठी विकली गेली? कदाचित त्या माणसावर तिचं खरंच प्रेम असावं. पण ती खरंच त्याच्या प्रेमात आहे, यावर विश्वास बसत नाही. ज्यांना पैशांसाठी प्रेम होतं, ते माझ्या नजरेतून तेवढ्याच लवकर उतरतात..., अशी पोस्ट तस्लिमा यांनी शेअर केली आहे.

टॅग्स :सुश्मिता सेनतस्लिमा नसरिनललित मोदीबॉलिवूड