Join us  

‘अर्जुन रेड्डी’च्या रिमेकमधून तारा सुतारिया आऊट! हे आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2018 9:25 PM

होय, शाहिद कपूरसोबत ‘अर्जुन रेड्डी’च्या रिमेकमध्ये तारा सुतारियाची वर्णी लागली होती. पण तारा या चित्रपटातून बाहेर झाल्याचे कळतेय. 

करण जोहरच्या ‘स्टुडंट आॅफ इ ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणार असणारी तारा सुतारिया हिच्या हाती एक मोठा चित्रपट लागला होता. होय, शाहिद कपूरसोबत ‘अर्जुन रेड्डी’च्या रिमेकमध्ये तिची वर्णी लागली होती. शाहिद कपूरला या चित्रपटात एक नवा चेहरा हवा होता. त्याच्या इच्छेखातर या चित्रपटात ताराला संधी देण्यात आली होती. पण आता ताजी खबर काही वेगळीच आहे. होय, तारा या चित्रपटातून बाहेर झाल्याचे कळतेय. आता ताराच्या जागी एक नवी अभिनेत्री यात दिसेल. ताराच्या डेट्समुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शाहिद कपूर परवा दुसऱ्यांदा बाबा झाला. सध्या तो पॅटर्निटी ब्रेकवर आहे. यामुळे चित्रपटाच्या डेट्समध्ये काही बदल केले गेलेत. पण ताराकडे या डेट्सला उपलब्ध नाहीत. यामुळे तारा आणि चित्रपटाच्या निर्मात्यांनी सांमजस्याने हा निर्णय घेतला. आता ताराच्या जागेवर कुणाची वर्णी लागते, ते लवकरचं कळेल.शाहिद कपूर पॅटर्निटी ब्रेकनंतर या चित्रपटाचे शूटींग सुरू करणार आहे. यासाठीची तयारी मात्र त्याने सुरू केलीय. या भूमिकेसाठी त्याने केस आणि दाढी वाढवली आहे.

‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून बॉलिवूड डेब्यू करणार असणारी तारा सुतारिया अभिनेत्री, गायिका आणि डान्सर आहे. तिने क्लासिकल बॅले, मॉडर्न डान्स आणि लॅटिन अमेरिकन डान्सची यूके येथे ट्रेनिंग केले आहे. त्याचबरोबर ‘तारे जमीं पर, गुजारिश आणि डेविड’ यासारख्या चित्रपटांमध्ये  डबिंगही केले आहे. ताराने व्हिडीओ जॉकी (व्हीजे) म्हणून डिज्नीमध्येही काम केले आहे.