Join us  

आलोक नाथसोबत काम करण्यावरून तनुश्री दत्ताने सुनावले अजय देवगणला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 4:44 PM

आलोक नाथवर लेखिका विनिता नंदाने लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला होता. या आरोपानंतर अनेकांनी आलोक नाथसोबत काम करण्यास नकार दिला होता.

ठळक मुद्देबॉलिवूड हे खोटारड्या लोकांनी भरलेले आहे. केवळ येथील मंडळी शो-ऑफ करतात. सध्या अनेकजण अजय देवगणवर बोट दाखवत आहेत. कारण या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होईपर्यंत आलोक या चित्रपटात असल्याचे कोणालाच माहीत नव्हते. 

तनुश्री दत्ताने खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये मीटू चळवळीला सुरुवात केली. तिने ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेवर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. तिच्या या आरोपानंतर बॉलिवूडमध्ये प्रचंड चर्चा रंगली होती. तनुश्रीनंतर बॉलिवूडमधील अनेक मंडळींनी मीडियासमोर येऊन त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी सांगितले होते. बॉलिवूडमध्ये आलेल्या या मीटूच्या वादळानंतर अनेकांनी लैंगिक अत्याचाराचा आरोप झालेल्या कलाकारांसोबत आम्ही काम करणार नाही असा निर्णय घेतला होता. 

आलोक नाथवर लेखिका विनिता नंदाने लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला होता. या आरोपानंतर अनेकांनी आलोक नाथसोबत काम करण्यास नकार दिला होता. पण आता आलोक नाथ अजय देवगणच्या दे दे प्यार दे या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या ट्रेलरमध्ये आपल्याला अजय देवगणसोबतच तब्बू, जावेद जाफ्री आणि आलोकनाथ यांना पाहायला मिळत आहे. 

दे दे प्यार दे या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आलोकनाथला पाहताच प्रेक्षकांनी याबाबत सोशल मीडियावर प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. आलोक नाथवर एका महिलेने बलात्काराचा आरोप लावला होता. मीटूमध्ये अडकलेल्या अभिनेत्याला चित्रपटात संधी कशी दिली असा प्रश्न आता सगळ्यांना पडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी पत्रकारांनी अजय देवगणला आलोकनाथ चित्रपटाचा भाग असण्याविषयी  सोशल मीडियावर दे दे प्यार दे या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाल्यावर तर अजय देवगण आणि या चित्रपटाचे निर्माते भुषण कुमार यांना लोकांनी विविध प्रश्न विचारत ट्रोल केले होते. आलोकनाथवर इतके गंभीर आरोप असताना देखील तुम्ही त्याच्यासोबत काम कसे करतायेत असे त्यांना विचारले गेले होते. एवढेच नव्हे तर आलोकनाथला वेगळा न्याय आणि मी टू प्रकरणात अडकलेल्या इतरांना वेगळा न्याय का दिला जात आहे असा देखील लोकांना प्रश्न पडला होता. 

 

 

आता या सगळ्यात तनुश्री दत्ताने अजय देवगणला आलोक नाथसोबत काम केल्याबद्दल चांगलेच सुनावले आहे. तिने म्हटले आहे की, बॉलिवूड हे खोटारड्या लोकांनी भरलेले आहे. केवळ येथील मंडळी शो-ऑफ करतात. सध्या अनेकजण अजय देवगणवर बोट दाखवत आहेत. कारण या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होईपर्यंत आलोक या चित्रपटात असल्याचे कोणालाच माहीत नव्हते. पण आलोक नाथ यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांच्यावर चित्रीत केलेल्या दृश्यांना पुन्हा चित्रीत करणे अजय देवगण तसेच या निर्मात्यांना जमले असते. पण तसे करण्यात आलेले नाही.

 दे दे प्यार दे हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट असून या चित्रपटाच्या ट्रेलरवरून हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवणार असा अंदाज लावला जात आहे. हा चित्रपट १७ मे ला प्रदर्शित होणार असून अकीव अली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

टॅग्स :तनुश्री दत्ता