Join us  

या प्रसिद्ध अभिनेत्याने केली आत्महत्या, त्याच्या निधनाने हळहळले चाहते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 3:02 PM

या अभिनेत्याने अनेक मालिकांमध्ये काम केले असून त्याची पत्नी देखील अभिनेत्री आहे.

ठळक मुद्देतामीळनाडूमधील जोलारपेट्टाई रेल्वे रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या एका झाडाला शशीकुमारचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर लोकांनी पोलिसांना बोलावले.

तामीळ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता शशीकुमारने आत्महत्या केली असून झाडाला लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह मिळाला. तामीळनाडूमधील जोलारपेट्टाई रेल्वे स्थानकाच्या जवळील झाडाजवळ त्याचा मृतदेह आढळला. 

शशीकुमारने हे पाऊल का उचलले याबाबत अद्याप काहीही कळले नसले तरी तो गेल्या काही दिवसांपूर्वी नैराश्यात होता असे म्हटले जात आहे. त्याच्यावर प्रचंड कर्ज असल्याने तो टेन्शनमध्ये होता अशी चर्चा सध्या रंगली आहे.

 

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, तामीळनाडूमधील जोलारपेट्टाई रेल्वे रेल्वे स्टेशनच्या जवळ असलेल्या एका झाडाला शशीकुमारचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर लोकांनी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी तिथे पोहोचल्यानंतर शशीकुमारची पत्नी राघवीला बोलावून या घटनेबाबत सांगितले. राघवीने मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोस्टमोर्टमसाठी मृतदेह पाठवण्यात आला.

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना पोलिस ऑफिसरने सांगितले की, शशीकुमार यांनी इतका टोकाचा निर्णय का घेतला याचा आम्ही सध्या शोध घेत आहोत. आर्थिक टंचाईसोबतच त्यांच्या आयुष्यात आणखी काही समस्या होत्या का याविषयी आमची टीम चौकशी करत आहे.

शशीकुमारने अनेक तामीळ मालिकेत काम करण्यासोबतच कॉलिवूड इंडस्ट्रीत सिनेमेटोग्राफर म्हणून काम केले आहे. त्याची पत्नी राघवी ही अभिनेत्री असून तिने देखील मालिकांमध्ये काम केले आहे. मी बंगलूरूला कामासाठी जात असल्याचे त्याने राघवीला सांगितले होते. पण तिथे जाण्याऐवजी त्याने वेल्लोरेला जाणारी बस पकडली. पण अर्ध्या रस्त्यातच म्हणजेच अंबूरला तो उतरला आणि तिथून तो जोलारपेट्टाई रेल्वे स्टेशनला गेला आणि तिथे त्याने आत्महत्या केली.  

टॅग्स :तामिळनाडू