Join us  

विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया लवकरच बांधणार लग्नगाठ! कुटुंबीयांच्या आग्रहाखातर अडकणार लग्नाच्या बेडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2023 2:48 PM

दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आहे.

'बाहुबली' अभिनेत्री तमन्ना भाटिया आणि 'डार्लिंग्स' फेम अभिनेता विजय वर्मा हे सध्या बी-टाऊनमधील सर्वात चर्चेत असलेल्या कपल्सपैकी एक आहेत.  काही दिवसांपूर्वी तमन्नाने विजयबरोबरच्या नात्याची कबुली सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती. त्यानंतर ते अनेकदा एकत्र दिसले.  दरम्यान, दोघेही लवकरच लग्न करणार असल्याची बातमी समोर आली आहे. तमन्ना लग्नाच्या तयारीसाठी तमान्ना कोणताच नवा प्रोजेक्ट साईन करत नसल्याची चर्चा आहे.  

 तेलुगू सिनेमाच्या रिपोर्टनुसार, तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा दोघेही त्यांच्या नात्याबद्दल खूप गंभीर आहेत आणि लवकरच लग्न करण्याच्या तयारीत आहेत. रिपोर्टमध्ये असेही म्हटले जात आहे की तमन्ना भाटियाचे कुटुंबीय तिच्यावर लग्नासाठी सतत दबाव आणत आहेत, त्यामुळे ती लवकरच लग्न करण्याचा विचार करत आहे. तमन्ना भाटियाने लग्नाच्या तयारीसाठी नवीन चित्रपट साइन करणे थांबवले आहे. ती अखेरची भोला शंकर आणि रजनीकांत स्टारर 'जेलर' चित्रपटातील  गाण्यात दिसली होती. नवीन चित्रपट साइन न करण्याच्या बातम्यांवरून तमन्ना लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.  

तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा 'लस्ट स्टोरीज 2' मध्ये एकत्र काम करताना दिसले होते. एका रिपोर्टनुसार, दोन्ही स्टार्स या मालिकेच्या सेटवरच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तमन्ना भाटिया आणि विजय वर्मा पहिल्यांदाच गोव्यात न्यू इयर सेलिब्रेट करताना दिसले, त्यानंतर त्यांच्या प्रेमाच्या चर्चा सुरू झाल्या. विजय वर्मा नुकताच करीना कपूर खान आणि जयदीप अल्लावत यांच्यासोबत 'जाने जान' चित्रपटात दिसला होता.

टॅग्स :तमन्ना भाटिया