Join us  

Trailer Out: इमरान हाश्मीच्या ‘चीट इंडिया’चा ट्रेलर आहे खास!  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2018 12:43 PM

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीचा नवा चित्रपट ‘चीट इंडिया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.

ठळक मुद्देगतवर्षी रिलीज झालेल्या इमरान खानच्या ‘हिंदी मीडियम’ने देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. आता  इमरान हाश्मीही असेच काही करताना दिसणार आहे.

बॉलिवूड अभिनेता इमरान हाश्मीचा नवा चित्रपट ‘चीट इंडिया’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ‘चीट इंडिया’चा टीजर प्रदर्शित झाला अन् हा चित्रपट भारतीय शिक्षण व्यवस्थेवर प्रहार करणारा असल्याचे स्पष्ट झाले. पण परिक्षेत होणा-या ‘चीटिंग’शिवाय या चित्रपटात आणखी काय दाखवले जाणार, याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता होती. आज रिलीज झालेला ट्रेलर पाहिल्यानंतर ही उत्सुकता काहीप्रमाणात शमते.या ट्रेलरची सर्वात खास बाब म्हणजे, इमरान हाश्मी या चित्रपटाचा हिरो आहे की विलेन? असा प्रश्न पडतो. कारण सुरूवातीला तो मुलांना चुकीचे काम करण्यासाठी प्रोत्साहन देताना दिसतो तर लगेच दुस-या भागात न्यायालयाच्या कठड्यात उभा राहून ‘अगर मैंने अमीर बच्चों की जेब से पैसा निकालकर गरीब बच्चों की जेब में डाला तो क्या गलत किया है,’असा प्रश्न विचारतो. 

गतवर्षी रिलीज झालेल्या इमरान खानच्या ‘हिंदी मीडियम’ने देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. आता  इमरान हाश्मीही असेच काही करताना दिसणार आहे.   इमरानने या चित्रपटात डोनेशन घेऊन मुलांचे अ‍ॅडमिशन करून देणा-या राकेश सिंह नावाचे पात्र साकारले आहे. चित्रपटाची निर्मिती टी-सीरिज, अतुल कासबेकर व तनुज गर्गच्या एलिप्सिस एण्टरटेन्मेंट आणि इमरान हाश्मी करतो आहे. या चित्रपटात इमरान हाश्मीशिवाय श्रेया धनवंतरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सौमिक सेन दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होतो आहे. याच तारखेला कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका द क्वीन आॅफ झांसी’ रिलीज होतोय. शिवाय हृतिक रोशनचा ‘सुपर ३०’ही याचवेळी बॉक्सआॅफिसवर धडकणार आहे. आता या दोन चित्रपटांना ‘चीट इंडिया’ कशी मात देतो, ते बघूच.

टॅग्स :इमरान हाश्मी