Join us  

 ‘तू तो आयुष्यमान का भाई लग रहीं है’ म्हणणा-या ट्रोलर्सला ताहिरा कश्यपने सणसणीत उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2019 10:37 AM

ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले, तेव्हापासून ती चर्चेत आहेत. पण यावेळी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. ताहिराच्या बॉयकट हेअरकटमुळे ती ट्रोल होतेय.

ठळक मुद्देताहिरा कश्यप गेल्या काही महिन्यांपासूनब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देतेय. या आजाराचा तिने धैर्याने सामना केला आणि ही लढाई जिंकलीही.

आयुष्यमान खुराणाची पत्नी ताहिरा कश्यप कॅन्सरशी झुंज देतेय. ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे निदान झाले, तेव्हापासून ती चर्चेत आहेत. पण यावेळी तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला. ताहिराच्या बॉयकट हेअरकटमुळे ती ट्रोल होतेय. ‘ताहिरा तो आयुष्यमान का भाई लग रहीं है,’ अशा कमेंट तिला ऐकाव्या लागत आहेत.

ताहिरा अलीकडे पती आयुष्यमानच्या ‘आर्टिकल 15’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला पोहोचली. पण यावेळी ट्रोलर्सनी ट्रोल करण्याआधीच ताहिराने एक सणसणीत पोस्ट लिहिली.

‘भाई-भाईचे इतके जोक्स ऐकलेत की, आता मी आयुष्यमानला भेटते तेव्हा बॅकग्राऊंडमध्ये एकच गाणे वाजते. ते म्हणजे, ‘तू मेरा, तू मेरा भाई नहीं है.’ मी सवाल करत नाहीये, पण हेअर पार्टिशन पाहा, वेगळे आहे ना? मग! तुम्हाला भाई-भाईपासून उसंत मिळालीच तर ‘आर्टिकल 15’ पाहण्यासाठी मी मंगळावरून पृथ्वीवर येण्यास किती मेहनत केलीय, याचा एकदा विचार करा,’ असे तिने लिहिले आहे.

ताहिरा कश्यप गेल्या काही महिन्यांपासूनब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देतेय. या आजाराचा तिने धैर्याने सामना केला आणि ही लढाई जिंकलीही. ताहिराने आपल्या आजाराबद्दल काहीही लपवले नाही.  केमोथेरपीने डोक्यावरचे केस गळले. पण ते लपवण्यासाठी ताहिराने खोटे केस लावले नाहीत तर थेट मुंडण केले,अगदी मुंडण केलेल्या अवतारात ती लॅक्मे फॅशन वीकच्या रॅम्पवरही उतरली.

यानंतर ताहिराने काय करावे तर, आपल्या सर्जरीची जखम दाखवणारा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.  तिच्या या पोस्टचे बरेच कौतुक झाले. आता ताहिरा बॉयकट हेअरस्टाईलमध्ये दिसू लागली आहे. पण काही लोकांनी यावरूनही तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत. ताहिराच्या या पोस्टचा अर्थ समजून तरी ट्रोलर्सची बोलती बंद होईल, अशी आशा करूयात.

टॅग्स :ताहिरा कश्यपआयुषमान खुराणा