Join us  

आमिर खानसोबतचा ‘तारें जमीं पर’ वाद पुन्हा जिवंत; 14 वर्षांनंतर अमोल गुप्ते यांनी तोडली चुप्पी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 11:02 AM

2007 मध्ये प्रदर्शित झालेला ‘तारें जमीं पर’ या सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावले होते. 14 वर्षांपूर्वी या सिनेमाशी संबंधित एक वादही गाजला होता.

ठळक मुद्देबॉलिवूडचा मिस्टर आमिर खान आणि बालकलाकार इशान अवस्थीच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा पाहून अनेकांचे डोळे पाणावलेत. आजही हा सिनेमा पाहताना डोळ्यांच्या कडा ओलावतात.

2007 मध्ये प्रदर्शित झालेला ‘तारें जमीं पर’ या सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावले होते. बॉलिवूडचा मिस्टर आमिर खान आणि बालकलाकार इशान अवस्थीच्या अभिनयाने सजलेला हा सिनेमा पाहून अनेकांचे डोळे पाणावलेत. आजही हा सिनेमा पाहताना डोळ्यांच्या कडा ओलावतात. 14 वर्षांपूर्वीच्या या सिनेमाशी संबंधित एक वादही गाजला होता. होय, सिनेमाच्या क्रेडिटमध्ये दिग्दर्शक म्हणून आमिर खानचे नाव दिसले होते तर अमोल गुप्ते यांना लेखक व क्रिएटीव्ह राईटरचे के्रडिट देण्यात आले होते. 14 वर्षांपूर्वी अमोल गुप्ते यांनी याविरोधात आवाज उठवला होता. आज 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा त्यांनी या वादावर चुप्पी तोडली आहे.

‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत अमोल गुप्ते या वादावर बोलले. या वादाबद्दल छेडले असता ते म्हणाले, आता बराच काळ लोटला आहे. आता घाबरण्याची गरज नाही. मी तसाही भूतकाळात रमणारा माणूस नाही. काळ्याकुट्ट अंधारानंतर पहाट येतेच. त्यामुळे मला आता याने काहीही फरक पडत नाही. आलेल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात नव्या उत्साहाने आणि कष्टाने करणारा मी माणूस. मी माझ्या कलेवर विश्वास ठेवतो. गेल्या 14 वर्षांपासून याच जोरावर मी चित्रपटसृष्टीत टिकून राहू शकलो.

आमिर खानसारख्या सुपरस्टारच्या विरोधात उभे राहण्याची किंमत चुकवावी लागली नाही का? असे विचारले असता ते म्हणाले, अर्थातच. मोठ्या सुपरस्टारविरोधात बोलत असाल तर तुम्हाला काहीतरी किंमत मोजावी लागतेच. पण अशास्थितीत काम करा, एकापाठोपाठ एक नवे प्रोजेक्ट आणा आणि पुढे जा. माझा माझ्या सिनेमाशी संबंध आहे. अन्य कोणाशी नाही.

काय होता वादसुरुवातीला अमोल गुप्ते हेच ‘तारें जमीं पर’ दिग्दर्शक होते. मात्र शूटींगदरम्यान काही मतभेद झालेत आणि अर्ध्यावर दिग्दर्शकाची संपूर्ण धुरा आमिरने स्वत:च्या खांद्यावर घेतली होती. यामुळे ‘तारें जमीं पर’च्या क्रेडिट्समध्ये दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून आमीर खानचे नाव झळकले होते.  तर अमोल गुप्ते यांना लेखक आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक म्हणून उल्लेख होता.   

 

टॅग्स :आमिर खानअमोल गुप्ते