Join us  

रिया चक्रवर्तीला सपोर्ट करणं तापसी पन्नूला पडलं महागात, वाचा लोकांनी कसं केलं ट्रोल?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 10:46 AM

रियाविरोधात सुशांतच्या मनात एक रोष बघायला मिळतोय. अशात रियाला सपोर्ट करणारं एक तापसी पन्नूचं ट्विट सोशल मीडियात व्हायरल झालं आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत केसमध्ये सीबीआय वेगाने तपास करत आहे. या केसमध्ये सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीसहीत तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, सॅम्युअल मिरांडा आणि त्याचा स्टाफ नीरज व दिपेशची चौकशी करत आहे. रियाविरोधात सुशांतच्या मनात एक रोष बघायला मिळतोय. अशात रियाला सपोर्ट करणारं एक तापसी पन्नूचं ट्विट सोशल मीडियात व्हायरल झालं आहे.

लोकांनी तापसीला केलं ट्रोल

तापसीने सुशांतच्या मृत्यूनंतर जवळपास अडीच महिन्यांनी पहिल्यांदाच त्याच्या पोस्ट केली आहे. पण सोशल मीडिया यूजर्सना तापसी हे ट्विट अजिबात पसंत पडलं नाही. त्यामुळे तिला सोशल मीडियावर सतत ट्रोल केलं जात आहे. तापसीने तिच्या ट्विटमध्ये रिया चक्रवर्तीला सपोर्ट केला आहे. तिने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मी पर्सनली ना सुशांतला ओळखत होते ना रियाला ओळखते. पण इतकं नक्की की,  न्यायपालिकेआधी एखाद्याला दोषी ठरवणं चुकीचं आहे. कायद्यावर विश्वास ठेवा'.

तापसीच्या या ट्विटवरून लोकांनी तिला फारच ट्रोल केलंय. एका यूजरने लिहिले की, 'तापसी मी तुझी फार मोठी फॅन होते. इन्स्टाग्रामवर फॉलो करत होते, पण ट्विटरवर तुझं प्रत्येक वेळी चुकीच्या लोकांना साथ देणं, चुकीच ट्विट करणं....हे सगळं बघून मनातून उतरली तू. कितीही चांगला मुव्ही केला तरी तुला चुकीची साथ देणं महागात पडेल'.

सुशांत केसमध्ये सीबीआय आज रिया चक्रवर्तीसोबत चौथ्यांदा चौकशी करणार आहे. सोबतच सीबीआय टीम आझ सुशांत सिंहची बहीण मीतू सिंहची सुद्धा चौकशी करणार आहे. त्यासाठी सीबीआयने मीतूला समन पाठवलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मीतू सिंह आणि  रिया चक्रवर्तीला समोरा-समोर चौकशी होऊ शकते. 

हे पण वाचा :

काय आहे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं डार्कनेट कनेक्शन?

बॉलिवूड माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती; कंगना राणौतचे राम कदमांना उत्तर

सुशांतच्या खात्यात होते 70 कोटी, रिया व तिच्या कुटुंबावर 50 लाखांची उधळपट्टी!

टॅग्स :तापसी पन्नूरिया चक्रवर्तीसुशांत सिंग रजपूत