Join us  

"कॉंग्रेसच्या सदस्याला काळ्या पाण्याची शिक्षा का नाही?", 'स्वातंत्र्यवीर सावरकर'चा भन्नाट ट्रेलर भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 8:37 AM

रणदीप हूडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर भेटीला

मागील काही दिवसांपासून रणदीप हूडाची प्रमुख भूमिका असलेल्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाची प्रचंड चर्चा आहे. काही दिवसांपुर्वी रिलीज झालेल्या सिनेमाच्या टिझरने प्रेक्षकांची चांगली पसंती मिळवली. आता नुकतंच 'स्वातंत्र्यवीर सावरकर' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झालाय. सिनेमाचा ट्रेलर पाहून रणदीप हूडाच्या अभिनयाचा जबरदस्त आविष्कार पाहायला मिळतोय. 

'स्वातंत्र्यवीर सावरकर'च्या ट्रेलरमध्ये दिसतं की, सावरकर अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा  भोगत आहेत. भारतातील सर्वात खतरनाक व्यक्ती म्हणून इंग्रज सावरकरांचा उल्लेख करत आहेत. पुढे सावरकरांनी साथीदारांसमवेत विदेशी मालाची केलेली होळी पाहायला मिळते. सावरकर-गांधींची झालेली भेटही दिसते. परदेशात जाऊन सावरकरांनी भारतात पुरवलेली शस्त्र, जहाजातून मारलेली उडी, स्वातंत्र्यलढ्यासाठी केलेलं संबोधन अशा अनेक गोष्टी 'स्वातंत्र्यवीर सावरकर' ट्रेलरमध्ये बघायला मिळतात.

'स्वातंत्र्यवीर सावरकर'च्या ट्रेलरमध्ये सावरकरांच्या भूमिकेत रणदीप हूडाच्या अभिनयाचा जबरदस्त आविष्कार बघायला मिळतो. रणदीपचा लूक, त्याची शरीरयष्टी, देहबोली हुबेहुब सावरकरांसारखी दिसते. अंकीता लोखंडेने सिनेमात यमुनाबाईंची भूमिका साकारली आहे. 'स्वातंत्र्यवीर सावरकर' २२ मार्चपासून चित्रपटगृहांत पाहायला मिळेल. सर्वांना या सिनेमाची उत्सुकता आहे.

 

टॅग्स :रणदीप हुडाविनायक दामोदर सावरकरअंकिता लोखंडे