Join us  

स्वरा भास्कर, सुशांत सिंहने अनुपम खेरच्या ट्वीटवर दिले सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 4:46 PM

बॉलिवूडमधील काही कलाकार, तंत्रज्ञ हे नरेंद्र मोदींच्या विरोधात असून या 600 कलाकारांनी एक पत्र लिहून अपील केले आहे की, भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका...

ठळक मुद्देअनुपम खेरच्या या व्हिडिओवर स्वरा भास्करने सर ही लोकशाही आहे. भारत माता की जय असे म्हणत रिप्लाय दिला आहे तर सोनी राजदानने अनुपम खेरला प्रश्न विचारला आहे की, तू या सरकारला पाठिंबा देत आहेस, तुझ्याचप्रमाणे इतरांनी देखील द्यावे असे तुला का वाटते? 

लोकसभा निवडणूकीचे बिगुल वाजले असून प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांचा जोरात प्रचार करत आहेत. देशातील विविध भागात सध्या प्रचारसभा आयोजित केल्या जात आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे देखील अनेकजण आपली मतं मांडत असून आपल्या आवडत्या पक्षाला समर्थन देत आहेत. तसेच आपल्या आवडत्या पक्षाला लोकांनी बहुमताने निवडून द्यावे अशी मागणी करत आहेत. पण लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावर बॉलिवूडमध्ये दोन गट पडले आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. बॉलिवूडमधला एक गट नरेंद्र मोदी यांना समर्थन देणारा आहे तर दुसरा गट हा मोदींच्या विरोधातील आहे.

बॉलिवूडमधील काही कलाकार, तंत्रज्ञ हे नरेंद्र मोदींच्या विरोधात असून या 600 कलाकारांनी एक पत्र लिहून अपील केले आहे की, भारतीय जनता पार्टीला मतदान करू नका... या प्रकरणाची गेल्या कित्येक दिवसांपासून मीडियात आणि सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. कलाकारांनी एखाद्या पक्षाला मतदान करू नये असे सांगणे ही गोष्ट चुकीची असल्याचे मत अनुपम खेरचे असून त्याने त्याचे मत मांडणारा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. पण अनुपम खेरच्या या व्हिडिओवर स्वरा भास्कर आणि सोनी राजदान या अभिनेत्रींनी सडेतोड उत्तर दिले आहे. अभिनेता सुशांत सिंहने तर या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना सध्याच्या सरकारची तुलना हिटलरसोबत केली आहे. 

 

अनुपम खेरच्या या व्हिडिओवर स्वरा भास्करने सर ही लोकशाही आहे. भारत माता की जय असे म्हणत रिप्लाय दिला आहे तर सोनी राजदानने अनुपम खेरला प्रश्न विचारला आहे की, तू या सरकारला पाठिंबा देत आहेस, तुझ्याचप्रमाणे इतरांनी देखील द्यावे असे तुला का वाटते? 

 

अभिनेता सुशांत सिंहने ट्वीटरवर म्हटले आहे की, सध्या शासनात असलेल्या सरकारला मतदान करू नये हे सांगणे हे कोणत्याही लोकशाहीत देशाविरोधी कृत्य असते का? ही हिटलरची विचारधारा आहे. तुमचे विचार खरंच चुकीचे आहेत सर...

 

टॅग्स :अनुपम खेरस्वरा भास्करसुशांत सिंग