Join us  

तर तुम्ही गाढव आहात..., मुलाच्या नावावरून करिनाला ट्रोल करणाऱ्यांवर बरसली स्वरा भास्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 10:31 AM

धाकट्या मुलाच्या नावावरूनही अनेक युजर्स सैफिनावर तुटून पडले आणि अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं सैफिनाला ट्रोल करणाऱ्यांचा चांगलाच क्लास घेतला.

ठळक मुद्दे2016 मध्ये करिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूर ठेवल्याचे तिने जाहिर करताच, अनेकांनी या नावावर आक्षेप घेतला होता.

करिना कपूर खानच्या (Kareena Kapoor Khan) धाकट्या मुलाचं नाव ‘जहांगीर’ (Jehangir)असल्याचा खुलासा झाला आणि सोशल मीडियावर पुन्हा एकदा ‘हंगामा’ झाला. सोशल मीडिया युजर्सनी करिना व सैफ अली खान (Saif Ali Khan) दोघांनाही जबरदस्त ट्रोल केलं. सैफ व करिनाने पहिल्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं होतं, तेव्हाही युजर्सनी सैफिनाला असंच ट्रोल केलं होतं. आता धाकट्या मुलाच्या नावावरूनही अनेक युजर्स सैफिनावर तुटून पडले. सैफिना अद्याप यावर काहीही बोललेले नाहीत. पण त्यांच्या बाजूने सैफची बहीण सबा मैदानात उतरली आणि पाठोपाठ बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिनंही सैफिनाला ट्रोल करणाऱ्यांचा चांगलाच क्लास घेतला.

‘एखाद्या दाम्पत्यानं आपल्या मुलाचं नामकरण केलं आहे.  मात्र ते दाम्पत्य तुम्ही नाही. तरिही त्या मुलाचं नाव काय असावं आणि का असावं? असे विचार तुमच्या डोक्यात येत असतील आणि त्यामुळं तुमच्या भावना दुखावत असतील तर तुम्ही जगातील सर्वात मोठे गाढव आहात,’ असं ट्वीट स्वरानं केलं. विशेष म्हणजे, हे ट्वीट करताना स्वरानं स्वत:च्या कामाशी काम ठेवा, असा हॅशटॅग दिला आहे. इतरांच्या आयुष्यात डोकावू नका, असं तिनं लोकांना बजावलं आहे.2016 मध्ये करिनाने पहिल्या मुलाला जन्म दिला होता. त्याचे नाव तैमूर ठेवल्याचे तिने जाहिर करताच, अनेकांनी या नावावर आक्षेप घेतला होता. यावरून करिना व सैफ दोघेही प्रचंड ट्रोल झाले होते. तैमूर लंग चौदाव्या शतकाचा एक शासक होता ज्यानं तैमुरी घराण्याची स्थापना केली होती. तो खूप अत्याचारी आणि निर्दयी असल्याचे म्हटलं जातं. सैफिनाने अशा शासकाच्या नावावर आपल्या मुलाचं नाव ठेवावं, यावर लोकांचा आक्षेप होता. या वादानंतर सैफने एका क्षणाला तैमूर हे नाव बदलण्याचाही विचार केला होता. पण करिनाचा याला विरोध होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर करिना व सैफने आपल्या दुस-या मुलाचे नाव अधिकृतपणे जाहिर केलेले नाही. शिवाय अद्याप त्याचा चेहराही जगाला दाखवलेला नाही.

टॅग्स :स्वरा भास्करकरिना कपूरसैफ अली खान