Join us  

सुजैन खानची मोठी बहीण फराह खान अली सुद्धा पतीपासून झाली वेगळी; म्हणाली, आम्हा आम्ही फक्त मित्र...!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 4:16 PM

सुजैन खानने 2014 साली हृतिक रोशनसोबत घटस्फोट घेतला, तेव्हा सगळ्यांना धक्का बसला होता. सुजैननंतर आता सुजैनची बहीण फराह अली खान ही सुद्धा पतीपासून विभक्त झाली आहे.

ठळक मुद्देफराह खान अली ही अभिनेता संजय खान यांची मुलगी आहे. ती पेशाने ज्वेलरी व फॅशन डिझाईनर आहे.

सुजैन खानने 2014 साली हृतिक रोशनसोबत घटस्फोट घेतला, तेव्हा सगळ्यांना धक्का बसला होता. सुजैननंतर आता सुजैनची बहीण फराह अली खान ही सुद्धा पतीपासून विभक्त झाली आहे. खुद्द फराहने सोमवारी रात्री एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

‘कधी कधी दोन लोक वेगळे होतात. कधी कधी त्यांचे मार्ग वेगळे होतात. एवढेच म्हणेल की, आम्ही आनंदाने एकमेकांपासून विभक्त झालोय. आम्ही कायम एकमेकांचे चांगले मित्र आणि आमच्या दोन्ही मुलांचे एक चांगले पालक असू. आम्ही आता कपल म्हणून राहू शकत नाही, हे आमच्या मुलांनी आता स्वीकारायला हवे. आम्ही परस्पर सहमतीने निर्णय घेतला आहे. दोन प्रौढ व्यक्तिंचा हा निर्णय आहे. यात कोणत्याही तिस-या व्यक्तिचा सहभाग नाही. हा निर्णय जगजाहिर करण्याचे कारण हेच आहे की, लोक आम्हाला ओळखतात. आमची परिस्थिती समजून घेतात. आमच्यासाठी प्रार्थना करतात. आम्हा दोघांमध्येही कुठलेही शत्रुत्व नाही आणि आम्ही नेहमी एकमेकांसाठी उभे राहू. अकील (फराहचा पती) कायम माझी फॅमिली असेल. आमचे शुभचिंतक आमच्या या निर्णयाचा आदर करतील आणि आम्हाला जज करणार नाहीत, अशी आशा करते, ’ असे फराहने लिहिले आहे.

फराह खान अली ही अभिनेता संजय खान यांची मुलगी आहे. ती पेशाने ज्वेलरी व फॅशन डिझाईनर आहे. अनेकदा ती राजकीय मुद्यांवर आपले मत मांडताना दिसते.  अभिनेते फिरोज खान तिचे काका आहेत तर अभिनेता फरदीन खान चुलत भाऊ आहे.  1999 मध्ये फराहने डीजे अकीलसोबत लग्न केले होते. 2002 मध्ये या दोघांना अजान नावाचा पहिला मुलगा झाला. 2005 मध्ये दोघांना दुसरी मुलगी झाली. अकील हा डीजे, सिंगर व कम्पोझर आहे.

टॅग्स :सुजैन खान