Join us

सुशचा सेल्फी टाईम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2016 10:38 IST

        आजकाल सेल्फी काढण्याचा मोह कोणाला झाला नाही तर नवलच वाटेल. सेल्फीचे भुत सगळ््यांवरच चढलेले दिसते. ...

        आजकाल सेल्फी काढण्याचा मोह कोणाला झाला नाही तर नवलच वाटेल. सेल्फीचे भुत सगळ््यांवरच चढलेले दिसते. काही झाले तरी आपल्या सुंदर क्षणांना सेल्फी मध्ये बंदिस्त करुन ठेवण्याची क्रेझ सध्या वाढत असल्याचेच दिसत आहे. सोशल साईटवर तर सेल्फीची लाट आल्याचेच पहायला मिळते. प्रत्येक मोमेंटचा सेल्फी सोशल नेटवर्कींग साईटवर अपलोड केला जातो. अशा सेल्फी फिवरमध्ये मग आपले बॉलीवुडस्टार कसे काय मागे राहतील बरं. सध्या सेल्फी मेनिया झालाय तो आपल्या ब्युटी क्वीन सुशला. सुश्मिता सेनने तर चक्क आपण जसे फोटोसेशन करतो तसे सेल्फी सेशन केले आहे. सुशने तिच्या क्वालिटी टाईम मध्ये तिचे वेगवेगळे मुड्स सेल्फी मध्ये कॅप्चर केले आहेत. यावेळी तिने क्रिम कलरचा टिशर्ट घातला असुन गाडीमध्ये मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करीत वेगवेगळ््या पोझ सुशने कॅमेरॅत कैद केल्या आहेत. सुशच्या या सेल्फीला लाईक तो बनता है ना....