Join us  

सुश्मिता सेन या दिग्दर्शकासोबत होती नात्यात, त्याने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 8:00 PM

सुश्मिताची आजवरची अनेक प्रेमप्रकरणं गाजली आहेत. सुश्मिता आणि एका दिग्दर्शकाच्या प्रेमप्रकरणाची चर्चा तर मीडियात चांगलीच रंगली होती.

ठळक मुद्देदस्तक या विक्रम भटच्या चित्रपटात सुश्मिताने काम केले होते. या चित्रपटाचे काही चित्रीकरण अमेरिकेत झाले होते. त्याचदरम्यान विक्रम आणि सुश्मिताच्या अफेअरची चर्चा सुरू झाली.

माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन हिच्या आयुष्यात काही महिन्यांपूर्वी रोहमन शॉलची एन्ट्री झाली होती. तिच्यापेक्षा 15 वर्षांनी लहान असलेल्या रोहमनसोबतचे सुश्मिताचे सोशल मीडियावरील फोटो चर्चेचा विषय ठरले होते. अगदी अलीकडे सुश्मिताच्या भावाच्या लग्नातही रोहमन भाव खाऊन गेला होता. लग्नात सुश्मितासोबत मिरवण्यापासून तिच्यासोबत रोमॅन्टिक डान्स करण्यापर्यंत तो दिसला होता. पण आता सुश्मिता आणि रोहमन या दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा कानावर येतेय. रोहमनच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचे दिसतेय. सुश्मितानेही रोहमनला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे.  

सुश्मिताची आजवरची अनेक प्रेमप्रकरणं गाजली आहेत. सुश्मिता आणि एका दिग्दर्शकाच्या प्रेमप्रकरणाची चर्चा तर मीडियात चांगलीच रंगली होती. दस्तक या विक्रम भटच्या चित्रपटात सुश्मिताने काम केले होते. या चित्रपटाचे काही चित्रीकरण अमेरिकेत झाले होते. त्याचदरम्यान विक्रम आणि सुश्मिताच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. विक्रमचे लग्न आदिती या त्याच्या बालमैत्रिणीसोबत झाले होते. दहा वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी लग्न केले होते. त्यांना एक मुलगी देखील होती. पण आदिती आणि विक्रमच्या कुटुंबियांसोबत सतत वाद होत होते आणि त्यात त्याच्या आणि सुश्मिताच्या अफेअरची चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला. घटस्फोटाच्यावेळी देखील मुलीच्या कस्टडीवरून त्यांच्यात वाद झाला होता. 

विक्रम आणि सुश्मिता यांची ओळख झाली त्यावेळी विक्रम 27 वर्षांचा तर सुश्मिता केवळ 20 वर्षांची होती. सुश्मिता विक्रमच्या हुशारीच्या तर विक्रम तिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडला होता. पण खूपच कमी वयात नात्यात पडल्यामुळे आम्ही दोघे खूपच इममॅच्युर्अड होतो असे विक्रमने ब्रेकअपनंतर कबुल केले होते. या ब्रेकअपनंतर सुश्मिताच्या करियरमध्ये देखील अनेक चढउतार आले.

विक्रमने तर यानंतर आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला होता. पण या आत्महत्येसाठी सुश्मिता नव्हे तर मी स्वतः जबाबदार असल्याचे त्याने सांगितले होते.

माझ्या आयुष्यासोबत मी जे काही केले ते चुकीचे होते. माझा घटस्फोट झाल्यानंतर सुश्मिताचा प्रियकर हीच केवळ माझी ओळख बनली होती. या सगळ्या गोष्टींचा मला त्रास होत होता. मी माझ्या मुलीला प्रचंड मिस करत होतो. 

टॅग्स :सुश्मिता सेनविक्रम भट