Join us  

मालदिवमध्ये बॉयफ्रेंडसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय बॉलिवूडची ही अभिनेत्री, ओळखलंत का तिला?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 10:45 AM

बॉलिवूडची ही अभिनेत्री सध्या मालदीवमध्ये बॉयफ्रेंडसोबत रोमांटिक हॉलिडे एन्जॉय करतेय.

बॉलिवूडची ही अभिनेत्री सध्या मालदीवमध्ये बॉयफ्रेंडसोबत रोमांटिक हॉलिडे एन्जॉय करतेय. मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर डान्स मुव्हज करतानाचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केलेत. आम्ही बोलतोय, सुष्मिता सेनबाबत. सध्या ती बॉयफ्रेंड रोमहन शॉलसोबत मालदीवमध्ये रिलेक्स करतेय. सुष्मिताचे हे फोटो तिची मुलगी आलिया सेनने काढले आहेत. 

सुष्मिता रोमहनसोबतचे फोटो सोशल मीडियावर बिनधास्त शेअर करत असते. गेल्या काही महिन्यांपासून सुश्मिता रोहमन शॉलसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. सुशच्या दोन्ही मुली अलिशा व रेनी यांनी सुद्धा रोहमनला स्वीकारले आहे. रोहमन व मुलींसोबतचे अनेक फोटो सुश सोशल मीडियावर शेअर करत असते.  

सुश्मिता सेन बराच काळ सिनेमाच्या पडद्यापासून लांब आहे. २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘नो प्रॉब्लम’ नंतर ती सिनेमात दिसलीच नाही. मात्र, रोहमनशी असलेल्या मैत्रीमुळे ती सतत चर्चेत असते.  यावर्षी अखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यात हे कपल लग्न करू शकते, अशी सध्या चर्चा आहे. चर्चा खरी मानाल तर, रोहमनने कधीच सुश्मिताला लग्नासाठी प्रपोज केले आहे आणि सुशनेही त्याचा लग्नाचा प्रस्ताव मान्य केला आहे.

रोहमनसोबत सुश्मिताची भेट कुठल्या इव्हेंट, शूटींग वा फॅशन शोमध्ये झाली नव्हती तर, सोशल मीडियावर झाली होती. रोहमन सुश्मिताचा खूप मोठा फॅन आहे.  एकदा त्याने सुशला इन्स्टावर एक पर्सनल मॅसेज पाठवला. या मॅसेजचे उत्तर मिळेल, ही अपेक्षाही त्याला नव्हती.

रोहमनने सुश्मिताला फुटबॉल ग्राऊंडवर त्याची मॅच पाहण्यासाठी बोलवले. ही त्यांची पहिली भेट. यानंतर दुस-या भेटीसाठी रोहमनने तिला कॉफीचे निमंत्रण दिले. अशाप्रकारे रोहमन आणि सुश्मिताच्या प्रेमाची गाडी पुढे गेली. 

टॅग्स :सुश्मिता सेनरोमहन शॉल