Join us  

चुकून मॅसेज वाचला अन् सुरु झाली सुश्मिता सेन व रोहमन शॉलची लव्हस्टोरी...!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 8:00 AM

सुश्मिता सेन दीर्घकाळापासून चित्रपटांमधून गायब आहे. पण चर्चेत राहणे मात्र ती विसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुश्मिता तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबतचे तिचे नाते आताश: कुणापासूनही लपलेले नाही. सुश्मितानेही ते कधी लपवण्याचा प्रयत्न केला नाही.

ठळक मुद्देतू लग्न कधी करणार? असा प्रश्न सुश्मिताला या इव्हेंटमध्ये विचारण्यात आला. यावर, आधी कुणी लग्नाबद्दल विचारायला तर हवे, असे रोहमनकडे पाहत, सुश्मिता म्हणाली.

सुश्मिता सेन दीर्घकाळापासून चित्रपटांमधून गायब आहे. पण चर्चेत राहणे मात्र ती विसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुश्मिता तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत आहे. बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलसोबतचे तिचे नाते आताश: कुणापासूनही लपलेले नाही. सुश्मितानेही ते कधी लपवण्याचा प्रयत्न केला नाही. सुश रोहमनसोबत खुल्लमखुल्ला फिरते, त्याच्याबद्दल अगदी खुल्लम खुल्ला बोलते. एका ताज्या इव्हेंटत सुश्मिता तिच्या व रोहमनच्या पहिल्या भेटीबद्दल बोलली. रोहमनही या इव्हेंटला हजर होता.

तू लग्न कधी करणार? असा प्रश्न सुश्मिताला या इव्हेंटमध्ये विचारण्यात आला. यावर, आधी कुणी लग्नाबद्दल विचारायला तर हवे, असे रोहमनकडे पाहत, सुश्मिता म्हणाली. यानंतर रोहमनसोबतच्या पहिल्या भेटीबद्दलही तिने सांगितले. रोहमनसोबत सुश्मिताची भेट कुठल्या इव्हेंट, शूटींग वा फॅशन शोमध्ये झाली नव्हती तर, सोशल मीडियावर झाली होती.

होय, रोहमन सुश्मिताचा खूप मोठा फॅन आहे. एकदा त्याने सुशला इन्स्टावर एक पर्सनल मॅसेज पाठवला. या मॅसेजचे उत्तर मिळेल, ही अपेक्षाही त्याला नव्हती. कारण सुश्मिता कधीच आपल्या इन्स्टा हँडलवरचा डीएम अर्थात डायरेक्ट मॅसेजचे ऑप्शन कधी ओपन करत नव्हती.( हा ऑप्शन ओपन केल्यावर मॅसेज पाठवणाºयास ‘वेलकम इन माय पर्सनल स्पेस’ अशा आशयाचा मॅसेज जातो.) एकदिवस सुश्मिता आपल्या मुलीसोबत काहीतरी बोलत असताना अचानक चुकून तिच्या हातून डायरेक्ट मॅसेजचे आॅप्शन ओपन झाले आणि रोहमनचा मॅसेज तिला मिळाला. रोहमनचा हा मॅसेज सुश्मिताला इतका आवडला की, तिने लगेच त्यावर रिप्लाय केला. सुश्मिताचा रिप्लाय आलेला पाहून रोहमनचे काय व्हावे? त्याचा आनंद गगणात मावेनासा झाला. मग काय मॅसेजचा हा ‘सिलसिला’ सुरु झाला. यानंतर   रोहमनने सुश्मिताला फुटबॉल ग्राऊंडवर त्याची मॅच पाहण्यासाठी बोलवले. ही त्यांची पहिली भेट. यानंतर दुस-या भेटीसाठी रोहमनने तिला कॉफीचे निमंत्रण दिले. अशाप्रकारे रोहमन आणि सुश्मिताच्या प्रेमाची गाडी पुढे गेली. आता तर या नात्याला ९ महिने पूर्ण होत आहेत.

टॅग्स :सुश्मिता सेन