Join us  

सुष्मिता सेनने बॉयफ्रेन्ड रोहमनबाबत केला खुलासा, म्हणाली -सुरुवातीला त्याने लपवले होते आपले वय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 8:09 PM

सुश्मिता आणि रोहमनमध्ये 15 वर्षांचे अंतर आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन यांच्या 'आर्य' या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. जो प्रेक्षकांना खूप आवडला आहे. चाहते या वेबसिरीजच्या रिलीजची वाट आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्री सुश्मिता सेन बॉयफ्रेन्ड रोहमन शॉलबाबत  एक खुलासा केला आहे. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, सुरुवातीला रोहमन त्याचे वय लपवून ठेवले होते. सुश्मिता आणि रोहमनमध्ये 15 वर्षांचे अंतर आहे, सुश्मिता सेन 44 वर्षांची आहे तर रोहमन 29 वर्षांचा आहे. दोघे दीर्घकाळापासून एकमेकांना डेट करतायेत.

अशी सुरु झाली होती सुश- रोहमनची लव्हस्टोरी रोहमनसोबत सुश्मिताची भेट कुठल्या इव्हेंट, शूटींग वा फॅशन शोमध्ये झाली नव्हती तर, सोशल मीडियावर झाली होती. होय, रोहमन सुश्मिताचा खूप मोठा फॅन आहे. एकदा त्याने सुशला इन्स्टावर एक पर्सनल मॅसेज पाठवला. या मॅसेजचे उत्तर मिळेल, ही अपेक्षाही त्याला नव्हती. कारण सुश्मिता कधीच आपल्या इन्स्टा हँडलवरचा डीएम अर्थात डायरेक्ट मॅसेजचे ऑप्शन कधी ओपन करत नव्हती.( हा ऑप्शन ओपन केल्यावर मॅसेज पाठवणा-यास ‘वेलकम इन माय पर्सनल स्पेस’ अशा आशयाचा मॅसेज जातो.) एकदिवस सुश्मिता आपल्या मुलीसोबत काहीतरी बोलत असताना अचानक चुकून तिच्या हातून डायरेक्ट मॅसेजचे ऑप्शन ओपन झाले आणि रोहमनचा मॅसेज तिला मिळाला. रोहमनचा हा मॅसेज सुश्मिताला इतका आवडला की, तिने लगेच त्यावर रिप्लाय केला. सुश्मिताचा रिप्लाय आलेला पाहून रोहमनचे काय व्हावे? त्याचा आनंद गगणात मावेनासा झाला. मग काय मॅसेजचा हा ‘सिलसिला सुरु झाला.

टॅग्स :सुश्मिता सेनरोमहन शॉल