Join us  

एक खंगलेले शरीर आणि प्रचंड नैराश्य...! चार वर्षे या गंभीर आजाराशी झुंज देत होती सुश्मिता सेन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 10:33 AM

हा आजार इतका गंभीर होता की सुश्मिता अक्षरश: मरणाच्या दारातून परत  परत आली होती.

ठळक मुद्देसुश्मिताला दर आठ तासांनी ते स्टेरॉइड घ्यावे लागायचे. यामुळे सुश्मिताचे  केस गळायचे, वजन झपाट्याने वाढू लागले.

अभिनेत्री सुश्मिता सेन बॉलिवूडमधल्या फिटनेस फ्रिक सेलिब्रिटींपैकी एक मानली जाते. सोशल मीडियावरही ती तितकीच अ‍ॅक्टिव्ह आहे़ पर्सनल लाईफबद्दलचे  अनेक किस्से ती याद्वारे शेअर करत असते. आता सुश्मिताने आपल्या एका आजाराबद्दल सांगितले आहे. हा आजार इतका गंभीर होता की सुश्मिता अक्षरश: मरणाच्या दारातून परत  परत आली होती.सुश्मिताने युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती Nunchaku द्वारे वर्क आऊट करताना दिसतेय. हा व्हिडीओ शेअर करताना तिने एक भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. याच पोस्टमध्ये तिने एडिसन नावाच्या आजाराबद्दल लिहिले आहे. याआधी एका मुलाखतीतही ती या आजाराबद्दल बोलली होती.

तिने लिहिले, ‘सप्टेंबर 2014 साली एका बंगाली चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर मी खूप आजारी पडली होती.  एके दिवशी मी अचानक बेशुद्ध पडले. यानंतर मला रूग्णालयात हलवण्यात आले़ यादरम्यान मला ऑटो इन्यूनसंबधित आजार असल्याचे निदान झाले. या आजाराचे नाव होते एडिसन. या आजाराने माझ्यातील शक्ती संपत चालली होती. एक थकलेले, खंगलेले  शरीर आणि खूप सारी निराशा होती. डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे तयार झाली होती. ते दिवस मी कधीही विसरू शकत नाही. या आजाराला हरवण्यासाठी मी चार वर्षे लढले. मी माझ्या मेंदूला आणि शरीराला यासाठी तयार केले. नान चकवर लक्ष केंद्रीत केले. या आजाराशी लढले आणि नंतर वेदना माझ्यासाठी कला ठरली, 2019 पर्यंत मी ठीक झाले़ यातून पूर्णत: बाहेर पडले.’

तिने पुढे लिहिले, ‘तुमच्या शरीराला तुमच्यापेक्षा कुणीच जाणू शकत नाही. तेव्हा शरीर काय म्हणतेय, ते ऐका. आपण एक योध्द्धा आहोत, तेव्हा लढा.’

काय होता हा आजारया आजारात सुश्मिताच्या शरिरात कोर्टिसोल नावाचे हार्मोन तयार होत नव्हते. सुरुवातीला डॉक्टरांना काय होतेय, हे कळेना. मग ब-याच चाणण्या केल्यानंतर  सुश्मिताच्या या आजाराचे निदान झाले होते. या हार्मोनच्या अभावामुळे शरीरातील अवयव हळूहळू निकामी होत जातात. या आजारातून वाचण्यासाठी तिला दर आठ तासांनी विशिष्ट प्रकारचे स्टेरॉईड घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सुश्मिताला सांगितले. त्यानंतर सुष्मिताने ते स्टरॉईड घेणे सुरु केले.

सुश्मिताला दर आठ तासांनी ते स्टेरॉइड घ्यावे लागायचे. यामुळे सुश्मिताचे  केस गळायचे, वजन झपाट्याने वाढू लागले.या जीवघेण्या आजारातून सुश्मिता कशी बाहेर आली तर तिने  आजारपणाने खचून न जाता, आजाराशी दोन हात करायचे ठरवले. योगा सुरू केला. Nunchaku वर्कआऊट सुरु केले़ 2016 मध्ये मध्ये पुन्हा एकदा तिच्या सर्व तपासण्या करण्यात आल्या. त्यावेळी तिला स्टेरॉईड घ्यायची गरज नसल्याचे आणि तिच्या शरीरात पुन्हा एकदा कोर्टिसोल बनणे सुरू झाल्याचे सांगण्यात आले़.

टॅग्स :सुश्मिता सेन