Join us  

बॉयफ्रेंड रोहमन शॉलसोबत व्हॅकेशन एन्जॉय करतेय सुश्मिता सेन, फॅमिली मेंबर्स होऊ शकतात सामील

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 12:10 PM

सुश्मिता सेन आणि रोहमन शौल जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.

सुश्मिता सेन आणि रोहमन शौल जवळपास दोन वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. रोहमन बहुधा सुश्मिता आणि तिची मुली रेनी आणि अलिशासमवेत फॅमिली फंक्शनमध्ये दिसतो.

याच दरम्यान, सुश्मिता , रोहमन, रेनी आणि अलिशासोबत सध्या  दुबईमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे. यावेळी कोणत्या शॉर्ट हॉलिडेवर ती गेली नाही. जानेवारी 2021च्या पहिल्या आठवडा संपेपर्यंत ते मुंबईत परतणार नाहीत. 

फॅमिली वेडिंगसाठी कोलकात्ताला जाणार सुश्मिता सेन नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, ' सुश्मिता आणि रोहमनला दुबईमध्ये आणखी नातेवाईक जॉईन करु शकतात. तेथून ते फॅमिली वेडिंगमध्ये सामिल होण्यासाठी कोलकाता पोहोचतील. '

सुश्मिताचा भाऊ देखील जॉईन करणार रिपोर्टनुसार, सुश्मिताचा भाऊ राजीव सेन आणि त्याची पत्नी आणि टीव्ही अभिनेत्री चारू आसोपादेखील त्यांच्यासोबत सामील होतील. रियुनिट झाल्यानंतर चारू आणि राजीवची ही पहिली रोमँटिक सुट्टी असेल.

फॅमिली हॉलिड होणार मजेशीर  'सुश्मिताच्या  कुटुंबासाठी ही सुट्टी खूप मजेशीर असणार आहे. बर्‍याच दिवसानंतर कुटुंबातील बरेच सदस्य एकमेकांना भेटतील. रोहमन आणि सुष्मिता सेनची लव्हस्टोरी फॅशन शो दरम्यान सुरू झाली होती. पण सुष्मिताने एका मुलाखती दरम्यान सांगितले की, त्यांची लव्हस्टोरी एका टच स्क्रीन फोनमुळे सुरू झाली होती. सुश्मिताने सांगितले होते की, रोहमनने तिला इन्स्टाग्रामवर डीएम केलं होतं

टॅग्स :सुश्मिता सेनरोमहन शॉल