Join us  

स्टाफ दिपेश सावंतचे समोर आले 14 जूनचे 'ते' व्हॉट्सअ‍ॅप चॅट, मेसेजमध्ये सुशांतच्या नावाचा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 3:49 PM

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात घरातील स्टाफ दिपेश सावंतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅटसमोर आले आहे.

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात घरातील स्टाफ दिपेश सावंतचे व्हॉट्सअ‍ॅप चॅटसमोर आले आहे. विशेष म्हणजे हे चॅट 14 जूनला सकाळी 10 वाजून 51 मिनिटपासून 4 वाजून 29 मिनिटांच्या दरम्यान करण्यात आलेले आहे. या चॅटमध्ये दिपेशने लिहिले की, या चॅटमध्ये दिपेशने लिहिले की सुशांतने मला फ्लिपकार्ट कराराबाबत तुझ्याशी संपर्क साधण्यास सांगितले आहे. हा मेसेज सकाळी 10 वाजता 51 मिनिटांनी आला.

यानंतर २ वाजून 48 मिनिटांनी वाजता सुशांतच्या निधनानंतर त्या व्यक्तीकडून रिप्लाय येतो , ''भाई, ठिक आहे ना? प्लीज उत्तर दे,  काही मदत हवी असेल तर आम्हाला कॉल कर, आम्ही बाहेर आहोत, तुम्हाला कोणत्याही गोष्टीची गरज वाटल्यास सांग,आम्ही 5 मिनिटांत येऊ.'' 

याच व्यक्तीने 9 जून रोजी व्हाट्सएपवर सुशांतशी बोललो होतो. ज्यामध्ये त्यांने  लिहिले - 'भाई, फ्लिपकार्ट तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहे, मी कोणाचा नंबर देऊ'.  सुशांतने रिप्लाय दिला - 'दिपेश माझ्याबरोबर आहे'.

या चॅटच्या आधारे सीबीआय दिपेश सावंतची चौकशी करते आहे. तसेच हा व्यक्ती कोण आहे आणि सुशांतच्या मृत्यूनंतर त्याने दिपेशला असे मॅसेज का केले हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतेय. सुशांत सिंह राजपूतच्या लीक झालेल्या ऑडिओ क्लिपने खळबळ, रियाच पैसे करत होती मॅनेज! 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत