Join us  

Shocking!! 13 जूनच्या रात्री ‘डार्क वेब’द्वारे झाले होते सुशांतच्या हत्येचे लाईव्ह टेलिकास्ट? 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 1:41 PM

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी खळबळजनक दावा; डार्क वेब म्हणजे काय?

ठळक मुद्दे14 जूनला सुशांतचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला होता.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूसंदर्भात सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. सुशांतच्या अखेरच्या क्षणांचे फोटो समोर आल्यानंतर सुशांतने आत्महत्या केली नव्हती तर त्याची हत्या झाली होती, असा कयास लावला जात आहे. यानिमित्ताने एक ना अनेक दावे केले जात आहेत. अशात पेशाने वकील असलेल्या विभोर आनंद यांनी एक खळबळजनक दावा केला आहे.सुशांतची हत्या करणा-यांनी त्याच्या मृत्यूचे लाइव्ह टेलिकास्ट केले होते, असा दावा विभोर आनंद यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे.

पोस्टमधील दावा

सुशांत सिंग राजपूत, दिशा सालियान आणि एका अल्पवयीन मुलीच्या हत्येचे डार्क वेबद्वारे जगभर लाईव्ह टेलिकास्ट केले गेले होते. हेच कारण आहे की, सुशांतला मृत्यूपूर्वी इतक्या क्रूरपणे मारले गेले आणि संपूर्ण बौॅलिवूड सुशांतला लाईव्ह मरताना बघत होते, असे विभोर आनंद यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सुशांत अचानक रडायचा, घाबरायचा...! उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केले धक्कादायक खुलासे

म्हणे, सुशांतने मला ड्रग्ज घेण्यासाठी बळजबरी केली; रिया चक्रवर्तीचा यु-टर्न

विभोर आनंद यांच्या या दाव्याने सुशांतच्या चाहत्यांना मोठा धक्का सला आहे. यानंतर चाहते बॉलिवूड सेलिब्रिटींना जबरदस्त ट्रोल करत आहेत.

या लोकांना झोपच कशी येतेय? असे एका युजरने लिहिले आहे. अन्य एका युजरनेही यावर केली आहे. ‘हा दावा खरा असेल तर खरोखर मनाला वेदना देणारा आहे,’ असे या युजरने लिहिले आहे.

14 जूनला सुशांतचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला होता.

डार्क वेब म्हणजे काय?आनंद विभोर यांच्या दाव्यानंतर डार्क वेब म्हणजे काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. इंटरनेटचे जग प्रचंड रहस्यमय आहे आणि आपल्याला कदाचित याच्या 4 टक्के माहित आहे. इंटरनेटचे जग तीन वेगवेगळ्या भागांत विभागले गेले आहे. सरफेस, डीप आणि डार्क असे हे तीन भाग आहेत. डार्क वेबवर तुम्ही क्रोम वा मोजिला ब्राऊजरच्या माध्यमातून जाऊ शकत नाही. डार्क वेबमध्ये केवळ स्पेशल अ‍ॅक्सेसद्वारे एन्ट्री होऊ शकते. या डार्क वेबच्या माध्यमातून ड्रग्ज व्यापार, शस्त्रास्त्रांची अवैध खरेदी-विक्री आणि अन्य बेकायदेशीर धंदे चालतात. टॉर ब्राऊजरचा वापर करणारेच डार्क वेबचा वापर करू शकतात. टॉर ब्राऊजर असा एक ब्राऊजर आहे, जो कोणीच ट्रॅक करू शकत नाही. या ब्राऊजरद्वारे काम करत असाल तर तुम्हाला कोणतीच सरकारी एजन्सीही ट्रॅक करू शकत नाही. कारण टॉर ब्राऊजरमध्ये सतत आयपी अ‍ॅड्रेस बदलला जातो.

  अनसीन व्हिडीओ व्हायरल

अलीकडे सुशांतचे दोन अनसीन व्हिडीओ व्हायरल झाले होते. या दोन अनसीन व्हिडिओमध्ये तो अस्वस्थ, बैचेन वाटतो आहे. झी न्यूजने सुशांतचा हा अनसीन व्हिडिओ शेअर करत असंख्य प्रश्न उभे केले होते. या व्हिडिओतून रियाचे पितळ उघडं पडल्याचा दावा झी न्यूजच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. रियाने सुशांतला प्रेमाच्या नावावर फसवले, लाचार बनवले, त्याला ड्रग्ज दिले, असा दावा यानिमित्ताने केला जात आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत