Join us  

सुशांत सिंग राजपूतचा ‘हा’ सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज, पाहा लाँच झाले नवे पोस्टर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 7:07 PM

आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर आता चंबळच्या खोऱ्यात जाण्यास सज्ज झाली आहे. पण चंबळच्या खोऱ्यात ती एकटी जाणार नसून तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूतही असणार आहे.

‘दम लगा के हाएशा’, ‘टॉयलेट-एक प्रेम कथा’ आणि ‘शुभ मंगल सावधान’ या सिनेमांत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेली अभिनेत्री भूमी पेडणेकर आता चंबळच्या खोऱ्यात जाण्यास सज्ज झाली आहे. पण चंबळच्या खोऱ्यात ती एकटी जाणार नसून तिच्यासोबत अभिनेता सुशांत सिंग राजपूतही असणार आहे. अभिषेक चौबे दिग्दर्शित सोन चिरैया या आगामी सिनेमाची ही नवी जोडी असणार आहे. होय, सुशांत सिंग राजपूतच्या चाहत्यांसाठी आता एक गुड न्यूज आहे, ती म्हणजे या सिनेमाचे नवे पोस्टर नुकतेच लाँच झाले आहे.  

 

आतापर्यंत अनेकदा सिनेमांमधून चंबळ खोरे प्रकाशझोतात आले आहे. पण या सिनेमात चंबळची एक वेगळी बाजू पाहायला मिळणार असे म्हटले जाते. पण ही वेगळी बाजू नक्की काय असणार हे जाणून घेण्याची उत्सुकता आता भूमी आणि सुशांतच्या चाहत्यांना लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चंबळच्या खोऱ्यात या दोघांमधील प्रेम दाखवण्यात येणार आहे. चंबळच्या खोऱ्यातील प्रेमकथा असल्यामुळे साहजिकच या सिनेमाचे चित्रीकरण तिथेच होणार आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपुत याच्या आगामी 'सोनचिडिया' या चित्रपटाची तयारी बऱ्याच काळापासून सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये सुशांत सिंग दरोडेखोराची भूमिका साकारणार आहे. १ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात भरपूर स्टंट्स आणि अ‍ॅक्शनचा थरार पाहायला मिळत आहे. सुशांत, मनोज बाजपेयी, भूमी पेडणेकर, रणवीर शौरी आणि आशुतोष राणा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक चौबे यांनी केले आहे तर निर्मिती रॉनी स्क्रुवाला यांची आहे. 

टॅग्स :सोन चिरैयासुशांत सिंग रजपूतभूमी पेडणेकर