Join us  

जिम पार्टनरचा खुलासा,शाहरुखमुळे सुशांत झाला होता अपसेट,सतत माझ्याकडे बोलायचा.....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 2:45 PM

अनेकदा ज्युनिअर कलाकारांसह पुरस्कार सोहळ्यांमध्ये विनोद करत त्यांच्यासह मस्ती करतानाचे आपण पाहतो. मात्र सुशांतच्या निधनानंतर हा व्हिडीओ समोर आल्यामुळे चाहत्यांचाही राग अनावर झाला.

सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीमुळे अनेक कलाकारांना टॅलेंट असूनही काम मिळत नाही. त्याच बरोबर येथे प्रत्येकाचे गॉडफादर आहेत. करण जोहर सलमान खान तर स्टारकिडस आणि त्यांच्या जवळच्या व्यक्तिंचेच भविष्य उज्वल करण्याचा जणू विडाच उचलला आहे. सुशांतला कोणताही सिनेमा मिळू नये यासाठी करण जोहरने सलमानसोबत मिळून षडयंत्र रचल्याचे समोर आले होते. त्यानंतर करण जोहर आणि सलमान विरोधात संताप व्यक्त होत आहे.  सलमान करण प्रमाणेच शाहरूखनेही सुशांतचा अपमान केला होता. आयफा अवॉर्ड्स दरम्यान शाहरुखने सुशांतला स्टेजवर बोलवून त्याचा अपमान केला होता. संपूर्ण जनतेसमोर अशा प्रकारे अपमानित झाल्यामुळे को खूप दुःखी झाला होता असे जिम पार्टनर सुनीलने सांगितले आहे. तो सतत त्याच गोष्टी माझ्याकडे बोलायचा.   

सुनीलने सांगितले की, आयफा अवॉर्ड्समध्ये सुशांत जेव्हा शाहरुख आणि शाहिदसोबत स्टेज शेअर करणार होता. तेव्हा शोपूर्वी शाहरुखने त्याच्याशी बोलताना म्हटले होते की, तो त्याच्यासोबत 'काय पो चे' विषयी बातचित करतील. यासाठी त्याने एक सिग्नेचर स्टेपची प्रॅक्सिस करण्यास सांगितले होते. सुशांत यासाठी खूप आनंदी होता. एवढेच नाही तर त्याच्या करिअर आणि स्ट्रगलविषयी संवाद साधला जाईल. मात्र स्जेटवर गेल्यावर भलतच घडलं. ठरल्याप्रमाणे स्टेजवर काही घडलेच नाही. याउलट सुशांतचा अपमान करण्यास सुरुवात केली. शाहरुखच्या अशा वागण्याचे सुशांतला खूप वाईट वाटले होते. सुशांतने जिममध्ये येऊन म्हटले होते की, मी तेथे गेलो, माझ्यासोबत खूप वाईट घडले, त्याने माझा खूप अपमान केला.

 IIFA सारख्या प्रतिष्ठीत मानल्या जाणा-या या अवॉर्ड शोमधील हा व्हिडीओ आहे. विशेष म्हणजे सा-यांसमोर कशा प्रकारे सुशांतची खिल्ली उडवली जात आहे. याबाबतचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख आणि शाहिदने सुशांतसिंग राजपूतला स्टेजवर बोलावले आणि त्यांची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळते आहे. अशात सुशांतही या सगळ्या गोष्टी केवळ हसण्यावर नेत असल्याचे पाहायला मिळत आहे. उपस्थित ऑडियन्सही मस्त या गोष्टीचा आनंद घेत आहेत.

मुळात अनेकदा ज्युनिअर कलाकारांसह पुरस्कार सोहळ्यांमध्ये विनोद करत त्यांच्यासह मस्ती करतानाचे आपण पाहतो. मात्र सुशांतच्या निधनानंतर हा व्हिडीओ समोर आल्यामुळे चाहत्यांचाही राग अनावर झाला.  चाहते या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रीया नोंदवत या गोष्टीचा जाहिर निषेधच करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूतशाहरुख खान