Join us  

सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्ती व श्रुती मोदीला केला होता मॅसेज, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 10:17 AM

व्हाट्सअ‍ॅप चॅट व्हायरल, सुशांत प्रकरणाला वेगळे वळण

ठळक मुद्देसुशांतचे वडिल रिया व श्रुतीला कॉल करत होते. त्यांनी मॅसेजही केला होता. श्रुतीने सुशांतच्या वडिलांच्या फोनचे उत्तर दिले नाही.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आता सीबीआय अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. दुसरीकडे ईडीचाही तपास सुरु आहे. अशात या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहे. अशात सुशांतचे वडील के. के. सिंग यांनी रिया चक्रवर्ती आणि सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी यांना केलेले व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज व्हायरल होत आहेत. सुशांतच्या वडिलांनी 29 नोव्हेंबर 2019 रोजी हे मॅसेज केले होते.  

काय आहे मॅसेजमध्ये?

रियाला पाठवलेल्या मॅसेजमध्ये सुशांतचे वडिल लिहितात, ‘तुला माहिती आहे की, मी सुशांतचा वडील आहे तर तू माझ्यासोबत बोलली का नाहीस? अखेर अशी काय गोष्ट आहे? जर तू त्याची मैत्रिण म्हणून त्याची देखभाल करत आहेत, त्याच्यावर उपचार करत आहेत तर माझेही कर्तव्य आहे की, सुशांतबद्दल मला सर्व माहिती असावी. त्यामुळे तू मला फोन कर आणि सगळे काही सांग.’ सुशांतच्या वडिलांनी सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी हिलाही मॅसेज केला होता. त्यात त्यांनी लिहिले होते की, ‘मला माहिती आहे की, सुशांतचे सगळे काम तू पाहतेस. तो आता कसा आहे, कुठल्या स्थितीत आहे, यासाठी बोलायचे होते. सुशांतसोबत बोलल्यानंतर मी खूप चिंतेत आहे, असे तो म्हणाला होता. अशात एक वडिल म्हणून मी किती चिंतेत असेल, हा विचार कर. त्यामुळे मला तुझ्याशी बोलायचे होते.  जर तू बोलण्यास उत्सुक नसशील तर मला विमानाचे तिकीट पाठवून दे, मला मुंबईत यायचे आहे’.

रिया व श्रुतींनी दोघींनीही दिले नाही उत्तरसुशांतचे वडिल रिया व श्रुतीला कॉल करत होते. त्यांनी मॅसेजही केला होता. श्रुतीने सुशांतच्या वडिलांच्या फोनचे उत्तर दिले नाही. रियानेही त्यांच्या मॅसेजकडे दुर्लक्ष केले. या मॅसेजवरून एक गोष्ट स्पष्ट आहे, ती म्हणजे सुशांत त्याच्या कुटुंबापासून दुरावला होता आणि त्याच्याशी बोलण्यासाठी, त्याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांना त्याच्या आजूबाजूच्या लोकांची मदत घ्यावी लागत होती.