Join us  

ती रात्र मी कधीच विसरू शकणार नाही...! सुशांतच्या भावोजींचा भावुक करणारा ब्लॉग  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 3:29 PM

भावाच्या मृत्यूची बातमी ऐकून अशी झाली होती बहिणीची अवस्था

ठळक मुद्देसुशांतच्या जीजूने सुशांतसोबतचा एक फोटोही शेअर केला. हा माझा सर्वात आवडता फोटो आहे, असे सांगत यामागचे कारणही त्यांनी सांगितले.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूच्या बातमीने अख्खा देश हादरला होता. त्याच्या कुटुंबाला तर अद्यापही सुशांत या जगात नाही, यावर विश्वास ठेवणे कठीण जातेय. सुशांतच्या मृत्यूला आज दोन महिने पूर्ण झालेत.  या पार्श्वभूमीवर त्याचे जीजू विशाल किर्ती सिंग यांनी एक ब्लॉग लिहून त्या दु:खद रात्रीचा अनुभव शेअर केला आहे. सुशांतच्या निधनाची बातमी कशी मिळाली आणि यानंतर पत्नीला (सुशांतची बहीण श्वेता) ही बातमी देताना त्यांची कशी अवस्था झाली, ते त्यांनी यात लिहिलेय.

विशाल लिहितात...अमेरिकेत त्यादिवशी रात्रीचे दोन वाजले होते. अचानक मोबाईल खणखणू लागला. सततच्या मॅसेज अलर्टने माझी झोप उघडली. पहिला मॅसेज बघितला आणि मला धक्काच बसला. काय ही बातमी खोटी आहे? असा तो मॅसेज होता. पण बातमी खरी होती.  पत्नी श्वेताला ही बातमी देणे सर्वात कठीण काम होते. मी श्वेताचाही फोन बघितला. तिच्याही फोनवर खूपसारे मॅसेज होते. श्वेताची ती अवस्था मी कधीही विसरू शकत नाही. तिला बातमी दिल्यावर तिने सर्वप्रथम रानी दीदीला (सुशांतची दुसरी बहीण) फोन केला. दोघीही फोनवर ढसाझसा रडत होत्या. त्या रात्रीने त्यांचे आयुष्य बदलले होते. यानंतर आम्ही लगेच भारतात जाण्याची तयारी सुरु केली. पण भारतात जाणे कठीण होते. कारण कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर बंदी होती. मुलांना सुशांतच्या निधनाची बातमी देणेही सर्वात कठीण काम होते. अखेर सकाळी आम्ही मुलांना सर्व काही सांगितले. त्या रात्री आम्ही काय गमावले, ते शब्दांत सांगता येणार नाही. आता आमचे आयुष्य पूर्वीसारखे कधीच होणार नाही.

शेअर केला आवडता फोटो

सुशांतच्या जीजूने सुशांतसोबतचा एक फोटोही शेअर केला. हा माझा सर्वात आवडता फोटो आहे, असे सांगत यामागचे कारणही त्यांनी सांगितले. त्यांनी लिहिले, ‘लग्नातील एका प्रथेनुसार सुशांतला मला दुप्पट्याने ओढायचे होते. हे करताना सुशांत प्रचंड नर्व्हस होता. असे करताना त्याला संकोच वाटत होता. यावरून कळते की तो किती संवेदनशील आणि समोरच्याचा आदर करणारा माणूस होता. सतत हसणा-या आणि दयाळू सुशांतच्या आता फक्त आठवणीच आमच्यासोबत आहेत....’ 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत